बजरंगी भाईजान फेम हर्षाली मल्होत्रा का शोधतेय अनिल कपूरचा नंबर, त्यामागे आहे हे रंजक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 17:55 IST2020-04-27T17:51:00+5:302020-04-27T17:55:15+5:30

बजरंगी भाईजानमधील मुन्नी म्हणजेच हर्षालीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून या व्हिडिओद्वारे ती अनिल कपूरचा नंबर मागताना दिसत आहे.

bajrangi bhaijaan fame harshali malhotra share funny video and ask for anil kapoor's number PSC | बजरंगी भाईजान फेम हर्षाली मल्होत्रा का शोधतेय अनिल कपूरचा नंबर, त्यामागे आहे हे रंजक कारण

बजरंगी भाईजान फेम हर्षाली मल्होत्रा का शोधतेय अनिल कपूरचा नंबर, त्यामागे आहे हे रंजक कारण

ठळक मुद्देहर्षाली या व्हिडिओत बोलताना दिसत आहे की, कोणाकडे अनिल कपूर यांचा नंबर असेल तर मला तो कृपया तुम्ही द्या... कारण मला त्यांच्याकडून मिस्टर इंडिया या चित्रपटातील ते खास घड्याळ घ्यायचे आहे. ते घड्याळ घालून मला काही काळासाठी तरी बाहेर जायचे आहे.

बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा 'बजरंगी भाईजान' हा चित्रपट सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात फक्त सलमानच्याच नाही तर मुन्नीची भूमिका साकारणाऱ्या हर्षाली मल्होत्रीचीदेखील खूप प्रशंसा झाली होती. या चित्रपटात मुन्नीच्या निरागसतेने रसिकांच्या मनाचा चांगलाच ठाव घेतला होता. या चित्रपटातील मुन्नी आता खूपच बदलली आहे. ती सध्या अभिनयक्षेत्रापासून दूर असली तरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. 

हर्षालीच्या एका व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. कारण या व्हिडिओत ती चक्क अनिल कपूर यांचा नंबर कोणाकडे आहे का असे विचारताना दिसत आहे. हर्षालीने अनिल कपूर यांचा नंबर विचारण्यामागे एक खास कारण आहे. हर्षाली या व्हिडिओत बोलताना दिसत आहे की, कोणाकडे अनिल कपूर यांचा नंबर असेल तर मला तो कृपया तुम्ही द्या... कारण मला त्यांच्याकडून मिस्टर इंडिया या चित्रपटातील ते खास घड्याळ घ्यायचे आहे. ते घड्याळ घालून मला काही काळासाठी तरी बाहेर जायचे आहे.

हर्षालीचा हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या व्हिडिओवर अनेक मजेदार कमेंट देखील आपल्याला वाचायला मिळत आहेत. तसेच हर्षाली आता पहिल्यापेक्षा खूपच वेगळी दिसत असल्याचे देखील तिचे चाहते कमेंटद्वारे तिला सांगत आहेत.

बजरंगी भाईजान या चित्रपटाआधी हर्षालीने काही मालिकांमध्ये काम केलं होते. यात 'कुबूल है', 'लौट आओ तृषा' आणि सावधान इंडिया या मालिकांचा समावेश आहे. मात्र बजरंगी भाईजान चित्रपटातील मुन्नीच्या भूमिकेमुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. तिला या सिनेमासाठी स्क्रीन अवॉर्डचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला होता.

बजरंगी भाईजान या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी हर्षाली केवळ सात वर्षांची होती. या चित्रपटात जेव्हा ती सलमानला फायटिंग किंवा इमोशनल सीन करताना पाहायची तेव्हा तिला रडू कोसळायचे. मग सलमान तिची समजूत काढायचा.

Web Title: bajrangi bhaijaan fame harshali malhotra share funny video and ask for anil kapoor's number PSC