काही तासांत पकडली गेली ‘बाहुबली’ प्रभासची ‘चोरी’! हॉलिवूडची केली कॉपी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 15:54 IST2017-10-25T10:24:52+5:302017-10-25T15:54:52+5:30
‘बाहुबली’ सीरिजच्या अभूतपूर्व यशानंतर सुपरस्टार प्रभास पुन्हा एकदा चाहत्यांना वेड लावणार, हे कालपरवा त्याच्या ‘साहो’ या चित्रपटाच्या पोस्टरवरून लक्षात ...

काही तासांत पकडली गेली ‘बाहुबली’ प्रभासची ‘चोरी’! हॉलिवूडची केली कॉपी!!
‘ ाहुबली’ सीरिजच्या अभूतपूर्व यशानंतर सुपरस्टार प्रभास पुन्हा एकदा चाहत्यांना वेड लावणार, हे कालपरवा त्याच्या ‘साहो’ या चित्रपटाच्या पोस्टरवरून लक्षात आलेय. २३ आॅक्टोबरला प्रभासच्या वाढदिवसाचे मुहूर्त साधून ‘साहो’चे फर्स्ट लूक जारी करण्यात आले होते. या पोस्टरमध्ये प्रभास ओवरकोसमध्ये दिसला होता. अंधारलेली धुक्यांची चादर वेढलेली रात्र आणि धुक्यातून एकटा चालत येणारा,चेहरा झाकलेला प्रभास असे हे पोस्टर कमालीचे इंटरेस्टिंग होते. या पोस्टर सगळ्यांचीच उत्सुकता वाढवली होती. ‘साहो’च्या याच पोस्टरबद्दल एक ताजी बातमी आहे. होय, हे पोस्टर म्हणे एका हॉलिवूड चित्रपटाच्या पोस्टरची कॉपी आहे. होय, अलीकडे ‘ब्लेड रनी2049’ हा हॉलिवूडपट रिलीज झाला होता. हेरिसन फोर्ड आणि रयान गॉसलिंग हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले होते. ‘साहो’चे पोस्टर याच चित्रपटाच्या पोस्टरची कॉपी असल्याचे समोर आले आहे. ‘साहो’चे पोस्टर रिलीज झाल्यानंतर काही क्षणात हे ‘ब्लेड रनी2049’ची कॉपी असल्याची चोरी पकडली गेली होती.
![]()
सुजीथ दिग्दर्शित ‘साहो’ पुढील वर्षी रिलीज होणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिची वर्णी लागली आहे. चित्रपटात ती डबलरोल साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात श्रद्धा प्रभासच्या तोडीला तोड असे अॅक्शन सीन्स करतानाही दिसणार आहे. चर्चा खरी मानाल तर, यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात श्रद्धा ‘साहो’मध्ये दिसणार आहे. यासाठी ती प्रचंड मेहनत घेत आहे. श्रद्धाशिवाय नितीन मुकेश, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर, जॅकी श्रॉफ आणि चंकी पांडे यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
ALSO READ: सर्वांसाठी खुला झाला ‘बाहुबली’ माहिष्मतीचा सेट! पाहा, फोटो!!
सूत्रांचे खरे मानाल तर, ‘साहो’ हा स्वातंत्र्याचीपूवीर्ची कथा आहे. चित्रपटात ब्रिटीश काळ दाखवला आहे. चित्रपटात सर्वत्र ब्रिटीश झेंडे दिसतील. मैदानावर शंभरावर घोडे दौडताना दिसतील. इतकेच नाही तर चित्रपटातील पात्र पोलो गेम खेळतानाही दिसतील. यातील पात्र राजा-महाराजांप्रमाणे रॉयल कुर्ता-पायजामा तर ब्रिटीश इंग्रज खाकी रंगाच्या युनिफॉर्ममध्ये असतील. सध्या रामोजी फिल्म सिटीत या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. यासाठी स्वातंत्र्यापूर्वीचा सेट उभारण्यात आला आहे.