'बाहुबली' सिनेमाचा काल्केय राक्षस कसा घडला,जाणून घ्या कोण आहे तो कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2017 10:43 IST2017-10-21T05:13:09+5:302017-10-21T10:43:09+5:30

cnxoldfiles/a>सिनेमातील प्रत्येक कलाकारानं त्याच्या वाट्याला आलेल्या भूमिकेला न्याय दिला. त्यामुळेच की काय त्या भूमिका रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.या ...

'Bahubali', how did the dark monster of the movie, know who is the artist, the artist | 'बाहुबली' सिनेमाचा काल्केय राक्षस कसा घडला,जाणून घ्या कोण आहे तो कलाकार

'बाहुबली' सिनेमाचा काल्केय राक्षस कसा घडला,जाणून घ्या कोण आहे तो कलाकार

cnxo
ldfiles/a>सिनेमातील प्रत्येक कलाकारानं त्याच्या वाट्याला आलेल्या भूमिकेला न्याय दिला. त्यामुळेच की काय त्या भूमिका रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.या सिनेमातील सगळ्याच भूमिका लक्षवेधी होत्या.मात्र एका भूमिकेची म्हणावी तितकी चर्चा झाली नाही.ही व्यक्तीरेखा म्हणजे काल्केय राक्षस.ही भूमिका एका पतियाळातील व्यक्तीने साकारली होती असं तुम्हाला सांगितल्यास तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं असून ही भूमिका पतियाळामधील लवी पजनी याने साकारली होती. या सिनेमातील काल्केय भलताच भाव खाऊन जातो. ही भूमिका राक्षसाची असल्याने आणि बाहुबली सिनेमातील इतर गोष्टी भव्य दिव्य असल्याने काल्केय रसिकांच्या फारसा चर्चेत आला नाही.मात्र याच भूमिकेने लवीचे करियर पालटलं आहे.लवीला जणू काही सिनेमांची लॉटरी लागली आहे.त्याच्याकडे आजघडीला तेलुगू आणि तमिळ सिनेमाच्या ऑफर्स आल्यात. लवकरच या सिनेमाच्या शूटिंगलाही तो सुरुवात करणार आहे. मात्र त्याला काल्केय ही भूमिका कशी मिळाली याची कथाही तितकीच रंजक आहे. वास्तव हा सिनेमा पाहिल्यानंतर लवीने स्वतःचे नाव खलनायक असं ठेवलं. त्याचे कॉलेजचे मित्रही त्याला याच नावाने हाक मारायचे.6 फूट 8 इंच उंचीचा लवी हा त्याच्या कॉलेजमध्ये सगळ्यात उंच होता. कॉलेजमध्ये शिकत असतानाच काल्केयची भूमिका त्याच्याकडे चालून आली. मात्र यांत सिंहाचा वाटा होता तो लवीच्या मित्राचा. त्याच्या मित्राने लवीचे काही फोटो बाहुबलीचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांना पाठवले. हे फोटो पाहून राजामौली यांनी लवीशी संपर्क साधून काल्केयच्या भूमिकेसाठी कॉल केला. मित्राने केलेल्या या कामामुळे लवीचे अख्खं आयुष्यच पालटलं आहे.'बाहुबली' सिनेमात काल्केय हा राक्षस लवीने रुपेरी पडद्यावर साकारला. दिसायला कुरुप, अक्राळ-विक्राळ अशी भूमिका लवीने मोठ्या खुबीने मोठ्या पडद्यावर साकारली. या भूमिकेसाठी म्हणजेच काल्केय साकारण्यासाठी लवीला प्रचंड मेहनत घ्यावी लागली.काल्केयचा मेकअप करण्यासाठी तब्बल पाच तासांचा कालावधी लागत असे आणि तोच मेकअप काढण्यासाठी 2 तास लागायचे. ही सगळी प्रक्रिया तब्बल एक महिना सुरु होती.या मेकअपची कमाल आणि लवीचा अभिनय यामुळे रुपेरी पडद्यावरील काल्केय भाव खाऊन गेला.

Web Title: 'Bahubali', how did the dark monster of the movie, know who is the artist, the artist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.