​बाहुबली २ ची प्रदर्शनाची तारीख लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 21:48 IST2016-08-04T16:18:10+5:302016-08-04T21:48:10+5:30

गतवर्षी प्रदर्शित झालेल्या बाहुबलीने प्रेक्षकांवर एकाप्रकारे जादूच केलेली आहे. या चित्रपटाने १०० कोटीहून अधिकची कमाई केली होती.  २०१७ मध्ये ...

Bahubali 2's expiry date will be postponed | ​बाहुबली २ ची प्रदर्शनाची तारीख लांबणीवर

​बाहुबली २ ची प्रदर्शनाची तारीख लांबणीवर


/>गतवर्षी प्रदर्शित झालेल्या बाहुबलीने प्रेक्षकांवर एकाप्रकारे जादूच केलेली आहे. या चित्रपटाने १०० कोटीहून अधिकची कमाई केली होती.  २०१७ मध्ये १४ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. परंतु, निर्मात्याने त्याची ही तारीख वाढवून २८ एप्रिल केली आहे. आधीच मोठी प्रतिक्षा असलेला हा चित्रपट  १४ दिवस लांबणीवर पडला आहे. त्याची  शुटींग ही आॅक्टोबर- नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे.  कटप्पाने बाहुबलीची हत्या का केली होती. याची प्रेक्षकांना  मोठी उत्सुकता आहे. याचे उत्तर प्रेक्षकांना बाहुबलीच्या दुसºया भागात मध्यतरानंतर मिळणार आहे. गतवर्षी निर्माता करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने हा चित्रपट खरेदी करुन, प्रदर्शित केला होता. मागील काही दिवसापासून चर्चा आहे की, बाहूबली - २ चे अधिकारही करणला देण्यात येईल. कदाचित असे होईलही , परंतु, करणला अधिक पैसे द्यावे लागतील. कारण की, निर्मात्याकडे अधिक आॅफर येत आहेत. बाहुबली - २ चा निर्माता हिंदीमध्ये करणलाच अधिकार देईल. परंतु, यावेळी अटी काही वेगळ्या असण्याची शक्यता  आहे. अटीसंदर्भात बोलणीही सुरु झाली आहे. निर्मात्याकडे वितरण अधिकाºयांचे मोठे प्रस्ताव येत असून, त्यास अंतिम रुप देण्यात येत आहे.

Web Title: Bahubali 2's expiry date will be postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.