​ ‘पद्मावती’ विरूद्ध ‘बाहुबली2’! होय, सामना अटळ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 15:29 IST2017-09-26T09:59:51+5:302017-09-26T15:29:51+5:30

‘बाहुबली2’ अर्थात ‘बाहुबली- द कनक्लुजन’ या चित्रपटाचे अभूतपूर्व यश बघता येत्या काळात अनेक चित्रपटांची या सिनेमाशी तुलना अपरिहार्य आहे. ...

'Bahubali 2' against 'Padmavati'! Yes, matchless !! | ​ ‘पद्मावती’ विरूद्ध ‘बाहुबली2’! होय, सामना अटळ!!

​ ‘पद्मावती’ विरूद्ध ‘बाहुबली2’! होय, सामना अटळ!!

ाहुबली2’ अर्थात ‘बाहुबली- द कनक्लुजन’ या चित्रपटाचे अभूतपूर्व यश बघता येत्या काळात अनेक चित्रपटांची या सिनेमाशी तुलना अपरिहार्य आहे.   संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’ची गोष्ट करायची झाल्यास, ही तुलना अटळ आहे. यावर्षी आत्तापर्यंत कुठलाही बॉलिवूडपट ‘बाहुबली2’ची बरोबरी करू शकलेला नाही. निर्मिती स्तरावरही ‘बाहुबली2’ला मात देणे अनेकांना अशक्य ठरले आहे. पण आता ‘पद्मावती’कडून ‘बाहुबली2’ला आव्हान मिळण्याची शक्यता दिसू लागली आहे. ‘पद्मावती’चे फर्स्ट लूक जारी होताच, या चित्रपटाची ‘बाहुबली2’सोबत तुलना होऊ लागली आहे. भन्साळींचा हा चित्रपट ‘बाहुबली2’ची भव्यता आणि यशाची पुनरावृत्ती करू शकेल का? असा प्रश्न म्हणूनच केला जात आहे. 

खरे तर कमाईच्या बाबतीत सध्या बोलणे योग्य होणार नाही. पण निर्मिती स्तरावर मात्र ‘पद्मावती’ विरूद्ध ‘बाहुबली2’ असा सामना हळूहळू रंगू लागला आहे. ‘बाहुबली’ सीरिजच्या दोन्ही चित्रपटांच्या यशाचे सर्वांत मोठे कारण होते ते या चित्रपटांत वापरले गेलेले व्हिज्युअल इफेक्ट्स. दिग्दर्शक एस, एस. राजमौली यांनी व्हीएफएक्स आणि स्पेशल इफेक्ट्सद्वारे इतका अभूतपूर्व सिनेमा उभा केला की, भारतीय चित्रपटाच्या इतिहासात कुणी अशा सिनेमाची अपेक्षाही केली नसावी. संजय लीला भन्साळींची नेमक्या याच कसोटीवर परिक्षा होणार आहे. खरे तर भन्साळी हे सुद्धा त्यांच्या ‘लार्जर देन लाईफ’ चित्रपटांसाठीच ओळखले जातात. त्यांचा ‘पद्मावती’ हा सिनेमाही असाच सिनेमा आहे. भव्यदिव्य सेट, हत्ती-घोडे, डोळे खिळवणारे महाल आणि अंगावर शहारे उभी करणारी युद्ध दृश्ये अशा सगळ्यांची भरमार त्यांच्या या चित्रपटातही असणार आहे. पण यावेळी त्यांच्या या चित्रपटातील प्रत्येक चित्रपटाच्या सीनची तुलना ‘बाहुबली2’सोबत होणार आहे. दोन्ही चित्रपटांची पार्श्वभूमी वेगळी असली तरीही ही तुलना होणार आहे. आता या तुलनेत भन्साळी ‘बाहुबली2’ला कशी मात देतात, ते पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. एकार्थाने हा मुकाबला तगडा असणार आहे. कारण ‘बाहुबली2’लामनात आणि मेंदूत ठेवूनच यावेळी प्रत्येकजण ‘पद्मावती’ बघणार आहे.

तुमच्या याबद्दल काय भावना आहेत, ते आम्हाला जरूर कळवा.

ALSO READ : ​ २२ कलाकार अन् चार महिन्यांचे संशोधन! तेव्हा कुठे फायनल झाला ‘पद्मावती’तील शाहिद कपूरचा ‘लूक’!!

Web Title: 'Bahubali 2' against 'Padmavati'! Yes, matchless !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.