'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' ने उघडली नशीबाची दारे! 'डॉन-३' मध्ये 'हा' अभिनेता साकारणार खलनायक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 11:24 IST2026-01-02T11:13:21+5:302026-01-02T11:24:24+5:30
२० वर्षानंतर कमबॅक अन् नशीब उजळलं! फरहान अख्तरच्या 'डॉन-३' साठी या अभिनेत्याची नावाची चर्चा

'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' ने उघडली नशीबाची दारे! 'डॉन-३' मध्ये 'हा' अभिनेता साकारणार खलनायक
Don 3 movie Update: फरहान अख्तर हा फक्त अभिनयासाठीच नाही, तर त्याने निर्मिती केलेल्या चित्रपटांसाठीदेखील ओळखला जातो.सध्या फरहान अख्तर त्याचा आगामी डॉन-३ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. एकीकडे धुरंधरचं यश अनुभवणाऱ्या रणवीर सिंगने अचानक चित्रपट सोडल्याची बातमी ताजी असतानाच कियारा अडवाणी आणि विक्रांत मेस्सीनेही या प्रोजेक्टमधून एक्झिट घेतल्याची चर्चा आहे. आता या चित्रपटासोबत एका अभिनेत्याचं नाव जोडण्यात येत आहे.
हिंदुस्थान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, फरहान अख्तरच्या या फ्रेंचायझीच्या तिसऱ्या भागात अभिनेता रजत बेदी दिसणार असल्याची शक्यता आहे. अलिकडेच रजत बेदी आर्यन खानच्या बॅडस् ऑफ बॉलिवूड या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. बऱ्याच कालावधीनंतर तो इंडस्ट्रीत परतला. या सीरिजमधील त्याचा कमबॅक हा लक्षात राहणारा आहे. बॅडस् ऑफ बॉलिवूड मधील त्याच्या अभिनयाचं सगळ्यांनीच कौतक केलं. आता तो डॉन-३ मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. दरम्यान, 'डॉन-३' मध्ये ज्या भूमिकेसाठी विक्रांत मेस्सीची निवड झाली होती, त्या भूमिकेसाठी त्याचा विचार केला जात आहे. अशी अपडेट समोर आली आहे. मात्र, अद्याप या माहितीला चित्रपटाचे निर्माते किंवा खुद्द फरहान अख्तरने दुजोरा दिलेला नाही. 'डॉन ३' हा फरहान अख्तरच्या महत्त्वाचा प्रोजेक्टपैकी एक आहे. त्यामुळे या लोकप्रिय फ्रेंचायझीमधील कलाकारांची कास्टिंग हा चर्चेचा विषय बनला आहे.
रजत बेदीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, 'कोई मिल गया' चित्रपटात खलनायक साकारुन रजत बेदी चांगलाच प्रसिद्धीझोतात आला होता.मात्र, त्यानंतर तर तो अचानक इंडस्ट्रीतून गायब झाला.२० वर्षानंतर रजतने आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' या सीरिजमधून इंडस्ट्रीत कमबॅक केलं आहे.