​बद्रिनाथ की दुल्हनियाचे पोस्टर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2017 21:35 IST2017-02-01T16:05:51+5:302017-02-01T21:35:51+5:30

बॉलिवूड अभिनेता वरुणधवन व अभिनेत्री आलिया भट्ट यांची मुख्य भूमिका असलेल्या बद्रिनाथ की दुल्हनीया या चित्रपटाच्या रिलीचची तयारी सुरू ...

Badrinath's bride's poster release | ​बद्रिनाथ की दुल्हनियाचे पोस्टर रिलीज

​बद्रिनाथ की दुल्हनियाचे पोस्टर रिलीज

लिवूड अभिनेता वरुणधवन व अभिनेत्री आलिया भट्ट यांची मुख्य भूमिका असलेल्या बद्रिनाथ की दुल्हनीया या चित्रपटाच्या रिलीचची तयारी सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वी ब्रदिनाथ की दुल्हनीयाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. या टीझरनंतर आता निर्मात्यांनी या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. वरुण धवन व आलिया भट्ट यांची जोरदार केमेस्ट्री या पोस्टरमध्ये दिसत आहे. 

दोन दिवसापूंर्वी प्रदर्शित करण्यात आलेल्या टीझरमध्ये अभिनेता वरुण धवनचा लूकमध्ये हटके दिसत होता. यात आलिया भट्टची भूमिका कशी असेल याचा अंदाज लावण्यासाठीच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे असेच म्हणायला हवे. निर्माता कंपनी धर्मा प्रोडक्शन यांच्या आधिकारीक ट्विटर अकाऊंटवरून या चित्रफटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले. यानंतर आलिया भट्ट, वरुण धवन आणि करण जोहरने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहे. तसेच त्यांनी या पोस्टरसोबत बद्रीची नवरी सगळ्यांना कधी भेटायला येईले हेही सांगितले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी २ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. तेव्हाच सगळ्यांना बद्रीनाथची दुल्हनिया म्हणजे आलिया भट्ट दिसेल.

 
अभिनेता वरुण धवनचे एक वेगळेच रुप या चित्रपटाच्या पहिल्या टिझरमध्ये पाहायला मिळत आहे. तो ज्यामध्ये एखाद्या सुपरस्टारप्रमाणे फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. पण काही केल्या बद्रिनाथला त्याची ही पोझ जमत नसल्यामुळे शेवटी त्याच्या रागाचा पारा चढून फोटोग्राफरवरच तो चक्क पायातील बूट फेकून राग व्यक्त करताना दिसत आहे. हा टीझर बघितल्यावर लक्षात येते की हा चित्रपट हम्प्टी शर्मा की दुल्हनियाचा सिक्वल आहे. मात्र चित्रपटाच्या टीमने ही गोष्ट संपूर्ण पणे फेटाळली आहे. या चित्रपटाची कथा पूर्णपणे वेगळी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.  या टीझरमध्ये आलिया भट्ट कुठेच दिसत नाही. वरुण धवन या टीझरमध्ये आलिया शिवायच दिसतो आहे. 

Web Title: Badrinath's bride's poster release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.