'बद्रीनाथ की दुल्हनियाँ' कोणत्या सिनेमाचा सिक्वेल नाही ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2016 11:04 IST2016-06-06T05:34:04+5:302016-06-06T11:04:04+5:30
आलिया भट्टचा 'बद्रीनाथ की दुल्हनियाँ' हा रोमँटिक कॉमेडी सिनेमा लवकरच बॉक्स ऑफिसवर येणार आहे. हा सिनेमा 2014 मधील सिनेमा ...

'बद्रीनाथ की दुल्हनियाँ' कोणत्या सिनेमाचा सिक्वेल नाही ?
आ िया भट्टचा 'बद्रीनाथ की दुल्हनियाँ' हा रोमँटिक कॉमेडी सिनेमा लवकरच बॉक्स ऑफिसवर येणार आहे. हा सिनेमा 2014 मधील सिनेमा 'हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ'चा सिक्वेल असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. मात्र हा सिनेमा सिक्वेल नसून पूर्णपणे नवी कथा असलेला सिनेमा असल्याचं आलियानं स्पष्ट केलंय. 'हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ' या सिनेमात वरुण धवन आणि आलियाची लव्ह स्टोरी रसिकांनी पाहिली होती. बद्रीनाथ की दुल्हनियाँ हा सिनेमासुद्धा एक लव्ह स्टोरी असून यातील पात्रं, कथा वेगळे असल्याचा दावा आलियानं केलाय. दुल्हनियाँ हा शब्दच काय तो समान धागा असल्याचं आलियानं स्पष्ट केलंय.