'दिल से सोल्जर, दिमाग से शैतान...', 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा धमाकेदार टीझर आऊट!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 12:27 PM2024-01-24T12:27:00+5:302024-01-24T12:28:48+5:30

अखेर आज सिनेमाचा धमाकेदार टीझर आऊट झाला आहे.

Bade Miyan Chote Miyan teaser out: Akshay Kumar, Tiger Shroff have each other's back as they fight against India's enemy | 'दिल से सोल्जर, दिमाग से शैतान...', 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा धमाकेदार टीझर आऊट!

'दिल से सोल्जर, दिमाग से शैतान...', 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा धमाकेदार टीझर आऊट!

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांच्या ‘बडे मियां छोटे मियां’ (Bade Miyan Chhote Miyan) हा सिनेमा चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते चित्रपटाच्या टीझरची वाट पाहत होते. अखेर आज सिनेमाचा धमाकेदार टीझर आऊट झाला आहे. टीझरमध्ये देशभक्ती आणि अ‍ॅक्शनचा तडका पाहायला मिळतोय. 

१ मिनिट ३८ सेंकदाच्या टीझरमध्ये 'दिल से सोल्जर, दिमाग से शैतान है हम,बचके रहना हमसे हिंदुस्तान है हम' असे दमदार डॉयलॉग ऐकायला मिळत आहेत. टीझरमध्ये  टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार हे दोघेही सैनिकांच्या भूमिकेत असून फुल-ऑन अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत.  दोघांनी मिलिट्री प्रिंट पॅन्ट आणि मॅचिंग रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. या टीझरनं चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं. टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांना आता फक्त या सिनेमाची उत्सुकता लागली आहे.

 चित्रपटातील अनेक स्टंट दृश्ये हॉलिवूड अ‍ॅक्शन तज्ञांच्या टीमसोबत शूट करण्यात आली आहेत. ‘बडे मियां छोटे मियां’ या सिनेमात टायगर आणि अक्षय  पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. हा एक बिग बजेट चित्रपट असून दिग्दर्शनाची धुरा अली अब्बास जफर यांनी सांभाळली आहे. तर वासु भगनानी, जॅकी भगनानी आणि पूजा एंटरटेनमेंटच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती झाली आहे.

 'बडे मियाँ छोटे मियाँ' यावर्षी ईदच्या मुहूर्तावर (10 एप्रिल 2024) प्रदर्शित होणार आहे.  स्टारकास्टबद्दल बोलायचे झाल्यास, यात सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर आणि अलाया एफ यांचाही समावेश आहे. दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन देखील या चित्रपटाचा एक भाग आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये अभिनेता खलनायकाची भूमिका साकारत आहे. त्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. 

Web Title: Bade Miyan Chote Miyan teaser out: Akshay Kumar, Tiger Shroff have each other's back as they fight against India's enemy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.