​आजी जया बच्चन यांच्यासोबत कधीच का दिसत नाही आराध्या बच्चन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 12:24 IST2017-10-02T06:54:00+5:302017-10-02T12:24:00+5:30

आराध्या बच्चन ही कुठल्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. सर्वाधिक लोकप्रीय स्टारकिड्सपैकी एक असलेली आराध्या बच्चन हिला ‘क्लिक’ करण्याची एकही संधी ...

Bachchan does not see anybody with Jaya Bachchan? | ​आजी जया बच्चन यांच्यासोबत कधीच का दिसत नाही आराध्या बच्चन?

​आजी जया बच्चन यांच्यासोबत कधीच का दिसत नाही आराध्या बच्चन?

ाध्या बच्चन ही कुठल्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. सर्वाधिक लोकप्रीय स्टारकिड्सपैकी एक असलेली आराध्या बच्चन हिला ‘क्लिक’ करण्याची एकही संधी फोटोग्राफर्स सोडत नाही. मग ती कान्स सोहळ्यादरम्यान असो किंवा विमानतळावर असो. आराध्या दिसेल तिथे तिला क्लिक करण्यासाठी कॅमेरे सरसावतात. आत्तापर्यंत आई ऐश्वर्या रायसोबत आराध्याचे अनेक फोटो तुम्ही पाहिले आहेत. पण यासगळ्यांत एक गोष्ट तुम्ही नोट केलीत?



आराध्या आईसोबत दिसते. पप्पा अभिषेक बच्चनसोबत दिसते. आजोबा अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसते. आजी (ऐश्वर्याची आई) वृंदा रायसोबतही दिसते. पण आजपर्यंत ती कधीच आजी (अभिषेकची आई) जया बच्चनसोबत दिसलेली नाही. आता यामागे कारण काय? आजी जया बच्चनसोबत आराध्या एकदाही दिसू नये, यामागे ऐश्वर्या तर नाही? 





बच्चन कुटुंबाच्या निकटस्थ सूत्रांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. सूत्रांनी सांगितले की, आराध्या आत्तापर्यंत एकाही सार्वजनिक ठिकाणी जया बच्चनसोबत दिसली नाही. दिसली ती केवळ वृंदा राय यांच्यासोबत. याचे कारण म्हणजे, जया बच्चन यांना आराध्यासोबत घालवायला अगदीच कमी वेळ मिळतो. घरी ऐश्वर्या आराध्याला एक क्षणही सोडत नाही. आराध्याच्या प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीसाठी ती हजर असते. त्यामुळेच आराध्याला कधीही कुठलीही मदत लागो ती आपल्या आजीकडे नाही तर आईकडे धावते. कदाचित त्याचमुळे आराध्या व जया यांचा फार कमी संपर्क येतो. 



ALSO READ : म्हणून 14 वर्ष ऐश्वर्या राय बच्चन बोलली नव्हती शाहरुख खानशी !

करिना कपूरचा लाडका मुलगा तैमूर अली खान आणि त्याची आजी शर्मिला टागोर यांच्याबाबतीतही अगदी असेच घडतेय. तैमूर आजी(करिना कपूरची आई) बबीतासोबत सर्रास दिसतो. पण शर्मिलासोबत तो एकदाही दिसलेला नाही. शर्मिला यांच्या जवळच्या सूत्रांचे मानाल तर, एक तर शर्मिला दिल्लीत राहतात आणि दुसरे म्हणजे बळजबरीने आजी बनण्याचा त्यांना शौक नाही. स्वत:च्या आणि करिना व सैफच्या सोयीने त्या तैमूरला भेटतात.
एकंदर काय तर, सूत्र म्हणतात त्यात तथ्य आहेच. कदाचित ऐश्वर्याने आराध्याला जयांचा फार लळा लागू दिला नाही आणि तैमूरच्या आजीला जबरदस्तीने आजीचा आव आणण्यात रस नाही. तूर्तास तरी आपआपल्या ठिकाणी सगळेच बरोबर दिसताहेत. पुढे बघूच...!!

Web Title: Bachchan does not see anybody with Jaya Bachchan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.