बेबी को ढोल पसंद है! होळीत पाहायला मिळाला नवा ट्रेंड, अभिनेत्रींनी ढोलवर बसून केली धमाल, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 15:54 IST2023-03-08T15:51:47+5:302023-03-08T15:54:32+5:30

होळी हा रंगांचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. रंगांची उधळण करत उत्साहात साजरा केला जाणारा हा सण बॉलीवूडकरांनी एन्जॉय केला.

Baby ko dhol pasand hai A new trend was seen in Holi actresses danced on a drum video went viral | बेबी को ढोल पसंद है! होळीत पाहायला मिळाला नवा ट्रेंड, अभिनेत्रींनी ढोलवर बसून केली धमाल, Video व्हायरल

बेबी को ढोल पसंद है! होळीत पाहायला मिळाला नवा ट्रेंड, अभिनेत्रींनी ढोलवर बसून केली धमाल, Video व्हायरल

होळी हा रंगांचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. रंगांची उधळण करत उत्साहात साजरा केला जाणारा हा सण बॉलीवूडकरांनी एन्जॉय केला. टीव्ही आणि फिल्म स्टार्सही होळीच्या रंगात सजलेले दिसले. यावेळी एक खास गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे होळीच्या पार्टीत अनेक स्टार्स ढोलावर बसून नाचताना दिसले.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होळी पार्टीत टीव्ही आणि फिल्म स्टार्सनी खूप धमाल केली. एकमेकांना रंग लावले. याचे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियात व्हायरल झाले. यातील सर्वात गंमत अशी आहे की काही अभिनेत्री चक्क ढोलावर बसूनच नाचू लागल्या. यामध्ये सौंदर्या शर्मा, उर्वशी रौतेला आणि शर्लिन चोप्रा यांसारख्या स्टार्सचा समावेश आहे.

शर्लिन चोप्राचा डान्स
होळी पार्टीत अभिनेत्री शर्लिन चोप्राचा वेगळा अवतार पाहायला मिळाला. पार्टीतील सर्वजण एकमेकांवर रंगांचा वर्षाव करत असताना शर्लिन ड्रमवरच बसली होती. ढोल वादक ढोल वाजवत असताना शर्लिन ढोलवरच बसली. रंगात रंगलेल्या शर्लिनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

ढोलवर उर्वशीचा भांगडा
उर्वशी रौतेला देखील ढोलवर नाचण्याच्या ट्रेंडमध्ये सामील झाली. होळीच्या पार्टीत तिनं ढोलवर बसून भांगडाही केला. नंतर उर्वशीने स्वतः तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.

View this post on Instagram

A post shared by Urvashi Rautela (@urvashirautela)

सौंदर्यानंही ढोलवर बसून केला डान्स
बिग बॉस फेम सौंदर्या शर्मा नेहमीच तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. आता तिचा होळीच्या पार्टीत ढोलवर बसून केलेला डान्स चर्चेत आहे. सौंदर्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

Web Title: Baby ko dhol pasand hai A new trend was seen in Holi actresses danced on a drum video went viral

टॅग्स :Holiहोळी 2023