बॉलीवुडची प्रसिद्ध बालकलाकार बेबी गुड्डू लाइमलाइटपासून दूर, जाणून घ्या सध्या काय करते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 18:02 IST2021-04-02T17:55:23+5:302021-04-02T18:02:01+5:30
child artist baby guddu aka Shahinda Baig then and now: बेबी गुड्डूने औलाद, समंदर, घर परिवार, घर घर की कहाणी, नगीना, मूलझीम, गुरू यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.चित्रपटांमध्ये बालकलाकार बेबी गुड्डूलाच घेतले जायचे.

बॉलीवुडची प्रसिद्ध बालकलाकार बेबी गुड्डू लाइमलाइटपासून दूर, जाणून घ्या सध्या काय करते?
८० च्या दशकातील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये बेबी गुड्डूने काम केले आहे. तिने त्या काळातील जवळपास सर्व सुपरस्टार्ससोबत काम केले. बेबी गुड्डूने अमिताभ बच्चन, सनी देओल, श्रीदेवी, जया प्रदा, जितेंद्र आणि मिथुन यांच्यासारख्या मोठ्या स्टार्ससोबत काम केलं आहे. यामध्ये सगळ्यात जास्त राजेश खन्ना बेबी गुड्डूचे खूप लाड करायचे.
बालकलाकार म्हणून बेबी गुड्डूने ३२ पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. बेबी गुड्डूचे खरे नाव शाहींदा बेग होते. ती निर्माते एमएम बेग यांची मुलगी होती. त्यामुळे अभिनय क्षेत्राशी तिचे नाते खूप जवळचे होते. वयाच्या तिसऱ्या वर्षी बेबी गुड्डूने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. त्यानंतर तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. बेबी गुड्डू बॉलिवूडपासून तर लांब गेलीच मात्र सोशल मीडियावरही ती नाही. त्यामुळे तिच्याविषयी फारशी माहिती कोणाकडेच नाही.
फार कमी वयात ती लोकप्रिय झाली. बेबी गुड्डूने औलाद, समंदर, घर परिवार, घर घर की कहाणी, नगीना, मूलझीम, गुरू यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.चित्रपटांमध्ये बालकलाकार बेबी गुड्डूलाच घेतले जायचे.१९८४ मध्ये बेबी गुड्डूचा पहिला सिनेमा 'पाप और पुण्य' आला होता. त्यासोबतच तिने अनेक जाहिरातींमध्येही काम केलं. बेबी गुड्डू तिच्या टूथपेस्टच्या जाहिरातीने घराघरात ओळखली जाऊ लागली होती.
११ वर्षांची असताना तिने सिनेमात काम करणं सोडलं आणि शिक्षणाकडे लक्ष दिलं.ती मोठी झाल्यानंतर अभिनेत्री होईल असे सर्वांना वाटत होते. पण तसे झाले नाही. १९९१ साली रिलीज झालेला घर परिवार चित्रपट बेबी गुड्डूचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर तिने बॉलिवूडला रामराम केला.सध्या बेबी गुड्डू दुबईत एअरलाईन्समध्ये काम करते. बेबी गुड्डू तिच्या संसारात आनंदी आहे. वैवाहिक जीवन एन्जॉय करते आहे.तिला मुले देखील आहेत.