"वैयक्तिक आयुष्यात ड्रामा..." सिद्धांत चतुर्वेदीची बाबिल खानच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 11:06 IST2025-05-05T11:01:15+5:302025-05-05T11:06:44+5:30

इरफान खान यांचा मुलगा बाबिल खानने बॉलिवूडवर टीका करत एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात त्यानं सिद्धांत चतुर्वेदी याचेही नाव घेतलं होतं.

Babil Khan Viral Video Bollywood Response Siddhant Chaturvedi Supports Babil Khan Team Statement | "वैयक्तिक आयुष्यात ड्रामा..." सिद्धांत चतुर्वेदीची बाबिल खानच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया, म्हणाला...

"वैयक्तिक आयुष्यात ड्रामा..." सिद्धांत चतुर्वेदीची बाबिल खानच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया, म्हणाला...

Babil Khan Viral Video: दिवंगत दिग्गज अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबिल खान सध्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. बाबिल खानने इन्स्टाग्रामवर धक्कादायक व्हिडीओ शेअर केला आहे. बाबिलचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते काळजीत पडले आहेत. बाबिलने व्हिडीओ शेअर करत बॉलिवूड खोटं आहे असं म्हटलं होतं. तसेच त्यानं अनन्या पांडे, शनाया कपूर, सिद्धांत चतुर्वेदी, राघव जुयाल, आदर्श गौरव, अर्जुन कपूर आणि अरिजित सिंग यांसारख्या कलाकारांचं नाव घेत बॉलिवूड असभ्य असल्याचा आरोप केला. त्यानंतर त्याने ते व्हिडीओ डिलीट केले आणि नंतर इंस्टाग्राम अकाऊंटही डिलीट केले. यावर बाबिलच्या टीमने त्याच्या वतीने व्हिडीओबद्दल स्पष्टीकरण जारी केलं आहे.  प्रामाणिकपणा, आवड आणि इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण केलेल्या प्रयत्नांचं कौतुक करण्यासाठी बाबिलनं संबधित कलाकारांचा उल्लेख केल्याचं टीमनं म्हटलं. आता यावर सिद्धांत चतुर्वेदीनं प्रतिक्रिया दिली आहे. 


सिद्धांत चतुर्वेदीनं इन्स्टाग्राम स्टोरीवर बाबिलचे काही व्हिडीओ पोस्ट केलेत. ज्यात त्याचं आणि बाबिलचं मैत्रीपुर्ण नातं पाहायला मिळत आहे. यासोबतच त्यानं लिहलं, "मी सहसा माझ्याबद्दल किंवा माझ्या सहकलाकारांबद्दल कुठे काय लिहिलंय, याकडे लक्ष देत नाही. Reddit, गॉसिप कॉलम्स,  मीडिया पोर्टल्स यांनी थोडं थांबाव. "प्रेम करायला द्वेष" आणि "द्वेष करायला प्रेम"  एवढंच शिल्लक राहिलंय का आपल्याकडे? आम्ही तुमच्यासाठी स्क्रीनवर ड्रामा आणतो, पण तुम्ही आमच्या वैयक्तिक आयुष्यात तो शोधता?  कदाचित आमच्या कामात काही कमी पडलं असेल. मग ते दाखवा, बोला, मदत करा. पण कृपया नाटक उभं करू नका. आमच्याकडून प्रयत्न सुरूच आहेत आणि एकच विनंती आहे की मत बनवण्यापूर्वी एकदा तरी विचार करा. शांततेतच खरी ताकद असते", या शब्दात त्यानं प्रतिक्रिया दिली. 


सिद्धांत चतुर्वेदीसोबतच बाबिलच्या व्हिडीओवर अनन्या पांडेनेही प्रतिक्रिया दिली. तिनं इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहलं, "बाबिल तुझ्यासाठी फक्त प्रेम आणि पॉझिटिव्ह एनर्जी, नेहमीच तुझ्या पाठीशी".  यासोबतच बाबिल खानच्या टीमने शेअर केलेलं निवेदनावर राघव जुयालनंही लिहिलं, "की बाबिल माझं कुटुंब आहे आणि काहीही झालं तरी मी नेहमीच त्याच्यासोबत असेन". 


बाबिलच्या व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण

"गेल्या काही वर्षात बाबिल खानला त्याच्या कामामुळे आणि त्याने त्याच्या मानसिक आरोग्याबाबत उघडपणे बोलल्याने खूप प्रेम मिळालं. प्रत्येकाप्रमाणेच बाबिललाही त्याच्या आयुष्यातही कठीण दिवसांचा सामना करावा लागत आहे. हे दिवस त्यापैकीच एक आहेत. त्याच्या हितचिंतकांना आम्ही सांगू इच्छितो की तो सुरक्षित असून आता बरा आहे. ज्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला. या व्हिडिओत बाबिलने त्याच्या मित्रांचं आणि ते भारतीय सिनेइंडस्ट्रीत ज्याप्रकारे योगदान देत आहेत या गोष्टीचं कौतुक केलं. त्याने अनन्या पांडे, अर्जुन कपूर, शनाया कपूर, अरजित सिंह, सिद्धांत चतुर्वेदी, राघव जुयाल, आदर्श गौरव या कलाकारांची नावं यासाठी घेतली कारण हे कलाकार खरंच त्याला आवडतात. आम्ही मीडिया आणि चाहत्यांना विनंती करतो की अर्धवट व्हिडिओ पाहून त्याच्या वक्तव्याचा कोणताही चुकीचा अर्थ काढू नका".

काय म्हणाला होता बाबिल?

"बॉलिवूड खूपच खराब आणि फेक इंडस्ट्री आहे. मी स्वतः याचा भाग राहिलो आहे. इथे फार थोडे लोक खरे आहेत, जे बॉलिवूडला सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. जे मला तुम्हाला सांगायचं आहे की शनाया कपूर, अनन्या पांडे, अर्जुन कपूर, सिद्धांत चतुर्वेदी, राघव जुयाल, आदर्श गौरव आणि अगदी अरिजित सिंग सारखे लोक आहेत. अजून बरीच नावे आहेत. बॉलिवूड खूपच बनावट आहे". 

"बॉलिवूड फेक, वाईट", बाबिल खानचा खळबळजनक व्हिडीओ, डिलीट केलं इंस्टाग्राम अकाउंट
 

 

Web Title: Babil Khan Viral Video Bollywood Response Siddhant Chaturvedi Supports Babil Khan Team Statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.