‘या’ चित्रपटांमधून केला ढोंगी बाबांचा पर्दाफाश; वाचा सविस्तर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 15:57 IST2017-08-31T10:23:50+5:302017-08-31T15:57:15+5:30
गुरुमीत राम रहीम प्रकरणाने पुन्हा एकदा देशात लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळणाºया ढोंगी बाबांचा मुद्दा उपस्थित केला आहे. बाबा रामपाल, ...
.jpg)
‘या’ चित्रपटांमधून केला ढोंगी बाबांचा पर्दाफाश; वाचा सविस्तर!
ग रुमीत राम रहीम प्रकरणाने पुन्हा एकदा देशात लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळणाºया ढोंगी बाबांचा मुद्दा उपस्थित केला आहे. बाबा रामपाल, नित्यानंद, आसाराम आणि आता राम रहीम यासारख्या ढोंगी बाबांनी केवळ भोळ्याभाबड्या लोकांच्या भावनाच दुखाविल्या नाहीत; तर त्यांच्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीचाही कळस गाठला आहे. आज हे सर्व तथाकथित बाबा त्यांच्या दुष्कर्माची शिक्षा भोगत आहेत. परंतु अजूनही आपल्या देशात बरेचसे असे भोंदूबाबा आहेत, ज्यांना लोक पूजत आहेत. अर्थातच कालांतराने त्यांचाही चेहरा उघड होणारच आहे. मात्र लोकांनी अशा बाबांपासून सावध राहावे हेच यातून बोध घेण्यासारखे आहे. काही बॉलिवूडपटांमध्ये तर याबाबतचा एकप्रकारे संदेशही देण्यात आला आहे. त्याचाच आढावा घेणारा हा वृत्तात...
![]()
‘पीके’ने केला भांडाफोड
दोन वर्षांपूर्वी आलेल्या ‘पीके’ या चित्रपटात भोंदूगिरीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. स्वत:ला गॉड म्हणून लोकांची दिशाभूल करणाºया भोंदूबाबाचा ‘पीके’ कसा पर्दाफाश करतो हे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. एक बाबा (सौरभ शुक्ला) लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळून आपला दरबार थाटतो. त्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढालही करतो; अखेर एक व्यक्ती त्याचा पर्दाफाश करण्यात यशस्वी होते, अशी काहीशी चित्रपटाची कथा आहे. धार्मिकतेसारखा अतिसहिष्णू मुद्दा पडद्यावर मनोरंजनात्मक पद्धतीने मांडण्यात अभिनेता आमीर खान यशस्वी ठरला आहे.
![]()
ग्लोबल बाबा
मार्च २०१६ मध्ये आलेल्या ‘ग्लोबल बाबा’ या चित्रपटाची कथा देशात फोफावत असलेल्या भोंदूगिरीचे वास्तव दर्शविणारी आहे. चित्रपटात एक कुख्यात गुन्हेगार कशा पद्धतीते बाबा बनून सिस्टमचा वापर करीत सरकार हलविण्याची ताकद ठेवतो हे दाखविले आहे. मात्र ‘अखेर सत्याचा विजय’ या फॉर्म्युल्यानुसार या बाबाचा खरा चेहरा उघड होतो. परंतु हा बाबा ज्या पद्धतीने धर्माच्या नावावर स्वत:भोवती समर्थकांचे सुरक्षा कवच निर्माण करतो अन् त्याच ताकदीवर थेट सिस्टमलाच आव्हान देतो ही बाब विचार करायला भाग पाडणारी आहे.
![]()
सिंघम रिटर्न्स
अजय देवगण स्टारर ‘सिंघम रिटर्न्स’ या चित्रपटाची कथादेखील एका बाबावर (अमोल गुप्ते) आधारित आहे. हा बाबा आपल्या ढोंगीपणाने केवळ सर्वसामान्यांनाच आपल्या जाळ्यात ओढत नाही तर सिस्टममधील मोठमोठ्या राजकारण्यांनाही तो भक्त बनवितो. राजकारणी, प्रशासनातील मोठमोठे अधिकारी त्याच्या दरबारात अक्षरश: लोटांगण घालतात. त्यामुळे आपण केलेल्या गुन्हेगारीला रोखण्यात कोणत्याही ताकद नाही, अशा आविर्भावात तो बाबा वावरतो. अखेर त्याचा एक पोलीस अधिकारी (अजय देवगण) साहस दाखवित त्याचा भांडाफोड करतो.
![]()
ओ माय गॉड
अभिनेता परेश रावल यांच्या ‘ओ माय गॉड’ या चित्रपटातही काहीशी अशीच कथा दाखविण्यात आली आहे. चित्रपटात परेश रावल बºयाचशा ढोंगीबाबांचा पर्दाफाश करून लोकांचा विश्वास संपादन करतात. चित्रपटातील त्यांचा एक डायलॉग त्यावेळी चांगलाच प्रसिद्ध झाला होता. ‘धर्म या तो लोगों को डरपोक बनाता हैं या आतंकवादी’.