OMG! ती आली अन् प्रभासच्या गालावर चापटी मारून पळत सुटली...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 14:09 IST2019-03-05T14:08:46+5:302019-03-05T14:09:23+5:30
प्रभासला पाहताच त्याचे चाहते वेडे होतात. याचे दर्शन नुकतेच घडले.

OMG! ती आली अन् प्रभासच्या गालावर चापटी मारून पळत सुटली...!!
ठळक मुद्दे‘साहो’मध्ये प्रभास एका गुप्तहेराच्या भूमिकेत आहे़ तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
‘बाहुबली’. ‘बाहुबली 2’ फेम प्रभास सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘साहो’मध्ये बिझी आहे. खरे तर ‘बाहुबली 2’ प्रदर्शित होऊन दोन वर्षे झालीत. या दोन वर्षांत प्रभासचा एकही चित्रपट पडद्यावर झळकला नाही. पण म्हणून प्रभासची क्रेज जराही कमी झाली नाही. आजही प्रभासला पाहताच त्याचे चाहते वेडे होतात. याचे दर्शन नुकतेच घडले.
प्रभास अलीकडे एका विमानतळावर दिसला. येथे एक चाहती प्रभासला पाहून अक्षरश: वेडी झाली. ती प्रभासजवळ गेली. त्याच्यासोबत सेल्फी घेतला. पण पुढे तिने जे काही केले, ते पाहून सगळेच दंग झालेत. होय, तिने सेल्फी घेतला आणि क्षणभर थांबून प्रभासच्या गालात हळूच एक चापटी मारत हसत हसत पळत सुटली. चाहतीचे हे वागणे पाहून प्रभासही अवाक् झाला. क्षणभर काय झाले, हेही त्याला कळले नाही. पण तोपर्यंत चाहती दूर गेली होती. मग काय, प्रभास गाल चोळत बसला आणि लगेच दुसºया चाहत्यासोबत फोटो काढू लागला. तूर्तास प्रभासचा आणि त्याच्या या क्रेजी चाहतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.
‘साहो’मध्ये प्रभास एका गुप्तहेराच्या भूमिकेत आहे़ तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुजीत यांनी दिग्दर्शित या चित्रपटात श्रद्धा कपूरशिवाय नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे, महेश मांजरेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘साहो’नंतर प्रभास लगेच दिग्दर्शक के के राधा कृष्ण कुमार यांच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात प्रभासच्या अपोझिट अभिनेत्री पूजा हेगडेची वर्णी लागली आहे. प्रभासचा हा चित्रपटही हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये तयार होणार आहे. या चित्रपटाच्या नावाचा खुलासा अद्याप झालेला नाही. पण लवकरच या चित्रपटाचे फर्स्ट शेड्यूल सुरू होणार आहे.