'बाहुबली' स्टार राणा दग्गुबाती होणार बाबा? पत्नीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 14:15 IST2022-04-03T14:14:31+5:302022-04-03T14:15:26+5:30

Rana daggubati: मिहिका आणि राणा यांनी २०२० मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचेही अनेक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

baahubali actor rana daggubati going to become father mihika pregnant know truth | 'बाहुबली' स्टार राणा दग्गुबाती होणार बाबा? पत्नीने केला खुलासा

'बाहुबली' स्टार राणा दग्गुबाती होणार बाबा? पत्नीने केला खुलासा

'बाहुबली' (Bahubali)  या गाजलेल्या चित्रपटातील भल्लाल देव (Bhallala deva) ही भूमिका गाजवणारा अभिनेता म्हणजे राणा दग्गुबाती (Rana Daggubati). आपल्या उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर राणाने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं आहे. त्यामुळे त्याच्याविषयीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. यामध्येच सध्या त्याची पत्नी मिहिका प्रेग्नंट असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राणा लवकरच बाबा होणार असं म्हटलं जात आहे. मात्र, मिहिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून या चर्चांविषयी मौन सोडलं आहे.

काही दिवसांपूर्वीच मिहिकाने राणासोबत एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये मिहिकाचं वजन किंचित वाढलेलं दिसत होतं. त्यामुळे ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आलं.  या चर्चांमध्येच आता मिहिकाने स्पष्टीकरण दिलं आहे.

मिहिका खरंच आहे प्रेग्नंट?

मिहिकाच्या प्रत्येक फोटोवर सध्या चाहते तिच्या प्रेग्नंसीविषयी प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे मिहिकाने एक पोस्ट शेअर करत उत्तर दिलं. मी इतक्यात आई होणार नाहीये. हे फक्त लग्नानंतर वाढलेलं वजन आहे, असं मिहिका म्हणाली.

दरम्यान, मिहिका आणि राणा यांनी २०२० मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचेही अनेक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. राणा दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. अलिकडेच तो 'भीमला नायक' या चित्रपटात झळकला होता.

Web Title: baahubali actor rana daggubati going to become father mihika pregnant know truth