Prabhas : ‘बाहुबली’ची भारी डिमांड, निर्मात्यांचा प्रभासवर १५०० कोटींचा ‘जुगार’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 18:53 IST2023-02-17T18:47:54+5:302023-02-17T18:53:31+5:30
Prabhas : प्रभासचे ‘बाहुबली 2’नंतर आलेले दोन्ही सिनेमे दणकून आपटले. सर्वप्रथम ‘साहो’ फ्लॉप झाला. पाठोपाठ ‘राधेश्याम’ या सिनेमाकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवली. पण तरिही प्रभासची डिमांड कमी झालेली नाही.

Prabhas : ‘बाहुबली’ची भारी डिमांड, निर्मात्यांचा प्रभासवर १५०० कोटींचा ‘जुगार’
साऊथ सुपरस्टार प्रभास (Prabhas) याची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. ‘बाहुबली’ सीरिजनंतर प्रभास देशविदेशात लोकप्रिय झाला. अद्यापही त्याची क्रेझ कायम आहे. प्रेक्षक त्याच्यावर फिदा आहेत. हेच कारण आहे की प्रत्येक निर्माता प्रभासला आपल्या चित्रपटात घेण्यास उत्सुक आहे. अगदी प्रभास म्हणेल तेवढी फी देण्यास निर्माते राजी आहेत. म्हणायला, प्रभासचे ‘बाहुबली 2’नंतर आलेले दोन्ही सिनेमे दणकून आपटले. सर्वप्रथम ‘साहो’ फ्लॉप झाला. पाठोपाठ ‘राधेश्याम’ या सिनेमाकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवली. पण तरिही प्रभासची डिमांड कमी झालेली नाही. विश्वास बसणार नाही पण ‘बाहुबली’नंतर बॅक टू बॅक फ्लॉप सिनेमे देणाऱ्या प्रभासवर निर्मात्यांनी थोडे थोडके नाही तर तब्बल १५०० कोटी डावावर लावले आहेत. येत्या ३ वर्षांत प्रभासने अनेक बिग बजेट सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.
आदिपुरूष
सर्वप्रथम या वर्षी प्रभासचा आदिपुरूष रिलीज होतोय. आदिपुरूषचा टीझर रिलीज झाल्यानंतर यातील व्हीएफएक्सची जबरदस्त खिल्ली उडवण्यात आली होती. प्रचंड ट्रोलिंगनंतर मेकर्सनी आदिपुरूषची रिलीज डेट पुढे ढकण्याचा निर्णय घेतला होता. आता व्हीएफएक्सवर नव्याने काम सुरू असल्याचं कळतंय. या सिनेमावर ४५० कोटींपेक्षाही अधिक खर्च झाला आहे. यात प्रभास क्रिती सॅननसोबत झळकणार आहे.
सालार
केजीएफचा दिग्दर्शक प्रशांत नीलच्या सालार या सिनेमात प्रभास मुख्य भूमिकेत आहे. सालारमधील प्रभासचा लुक पाहून चाहते क्रेझी झाले आहेत. ॲक्शन ड्रामा असलेल्या या सिनेमाचा बजेट २५० कोटींपेक्षा अधिक आहे. आता यापैकी किती बजेट प्रभास वसूल करून देतो हे तर सिनेमा रिलीज झाल्यानंतरच कळणार आहे.
प्रोजेक्ट के
दिग्दर्शक नाग अश्विन यांनी दिग्दर्शित केलेल्या प्रोजेक्ट के या सिनेमात प्रभास आहे. त्याच्यासोबत दीपिका पादुकोण झळकणार असल्याचं वृत्त आहे. इतकंच नाही तर अमिताभ बच्चन यांचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या सिनेमाचा बजेटही ४०० कोटी रूपये आहे.
स्पिरिट
प्रभासने ‘अर्जुन रेड्डी’ फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा एक सिनेमा साईन केला आहे. या चित्रपटाचं नाव स्पिरिट असल्याचं कळतंय. यात प्रभाससोबत श्रुती हसन झळकणार आहे. या सिनेमाचा बजेटही २०० कोटींवर असल्याचं कळतंय. याशिवाय दिग्दर्शक मारूथी यांचा एक सिनेमाही प्रभासने साईन केला आहे. या चित्रपटाचं नाव गुलदस्त्यात आहे. पण याचा बजेटही १०० कोटींपेक्षा अधिक असल्याची चर्चा आहे.