‘बाहुबली’ प्रभासच्या वाढदिवसाला चाहत्यांना मिळू शकते ‘हे’ मोठ्ठे सरप्राईज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 11:40 IST2018-09-27T11:38:37+5:302018-09-27T11:40:14+5:30

‘बाहुबली’ सीरिजनंतर साऊथ सुपरस्टार प्रभास सगळ्यांच्या गळ्यातील ताईत झाला. देशभरातील तरूणी तर या ‘मोस्ट एलिजेबल बॅचलर’वर अक्षरश: फिदा आहेत. 

baahubali actor prabhas to make wedding announcement on his birthday 23 october | ‘बाहुबली’ प्रभासच्या वाढदिवसाला चाहत्यांना मिळू शकते ‘हे’ मोठ्ठे सरप्राईज!

‘बाहुबली’ प्रभासच्या वाढदिवसाला चाहत्यांना मिळू शकते ‘हे’ मोठ्ठे सरप्राईज!

बाहुबली’ सीरिजनंतर साऊथ सुपरस्टार प्रभास सगळ्यांच्या गळ्यातील ताईत झाला. स्वभावाने अतिशय लाज-याबुज-या प्रभासचे जगाच्या पाठीवर असंख्य चाहते आहेत. देशभरातील तरूणी तर या ‘मोस्ट एलिजेबल बॅचलर’वर अक्षरश: फिदा आहेत. ३८ वर्षांच्या प्रभासने अद्यापही लग्न केलेले नाही. प्रभासच्या लग्नाची बातमी ऐकण्यासाठी चाहते उत्सूक आहेत. पण आता चाहत्यांना फार प्रतीक्षा करावी लागणार नाही. होय, पुढील महिन्यात २३ तारखेला प्रभासचा वाढदिवस आहे. याच दिवशी प्रभास लग्नाची घोषणा करू शकतो, असे कळतेय. तशा गेल्या अनेक दिवसांपासून प्रभासच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. ‘बाहुबली2’तील त्याची को-स्टार अनुष्का शेट्टी हिच्यासोबत प्रभास लग्न करणार, अशी बातमीही मध्यंतरी येऊन गेली. अर्थात प्रभास व अनुष्का दोघांनीही या बातम्या कायम नाकारल्या. आम्ही कुठल्याही कमिटमेंटमध्ये नाही, हे दोघांनीही स्पष्ट केले. अर्थात तरिही या दोघांच्या लिंकअपच्या चर्चा थांबलेल्या नाहीत. अलीकडे तर अनुष्का एका टीपिकल प्रेयसीसारखी वागू लागलीयं आणि कथित बॉयफ्रेन्ड प्रभासबदद्ल ती बरीच पसेसिव्ह झालीय, असेही ऐकीवात आले होते.
मध्यंतरी तेलगू इंडस्ट्रीचे लोकप्रीय अभिनेते कृष्णम राजू यांनी प्रभास यंदा लग्न करू शकतो, याबाबतचे संकेत दिले होते. कृष्णम राजू हे प्रभासचे काका आहेत. एका मुलाखतीत त्यांना प्रभास कधी लग्न करणार, असे विचारले गेले होते़. यावर कृष्णम यांनी मोठा खुलासा केला होता. प्रभास कधी लग्न करणार, हे मला प्रत्येक मुलाखतीत विचारले जाते. आज मात्र मी याचे उत्तर देणारचं. प्रभास याचवर्षी लग्न करतोय. त्याची स्वत:चीही या वर्षी लग्न करण्याची इच्छा होती, असे त्यांनी सांगितले होते. प्रभासच्या काकांनी दिलेली ही बातमी कदाचित खरी ठरणार, अशी चिन्हे आहेत. सध्या प्रभास ‘साहो’ या चित्रपटात बिझी आहे. यात प्रभासच्या अपोझिट दिसणार आहे ती श्रद्धा कपूर. या चित्रपटात प्रभास दमदार अ‍ॅक्शन करताना दिसणर आहे. विशेष म्हणजे या अ‍ॅक्शन सीन्ससाठी बॉडी डबल घेण्यास प्रभासने नकार दिला आहे. त्यामुळे प्रभास स्वत: सगळे स्टंट सीन्स करतोय.

Web Title: baahubali actor prabhas to make wedding announcement on his birthday 23 october