'Bahubali' will you ever celebrate Prabhas? Uncle disclosed! | ​‘बाहुबली’ प्रभास कधी करणार लग्न? काकांनी केला खुलासा!

‘बाहुबली2’ रिलीज झाला अन् प्रभास जगभर ओळखला जावू लागला. आता तर प्रभास सतत चर्चेत असतो. कधी लग्नावरून तर कधी त्याचा आगामी चित्रपट ‘साहो’वरून. तशा गेल्या अनेक दिवसांपासून प्रभासच्या लग्नाच्या बातम्या येत आहे. ‘बाहुबली2’तील त्याची को-स्टार अनुष्का शेट्टी हिच्यासोबत प्रभास लग्न करणार, अशी बातमीही मध्यंतरी येऊन गेली. अर्थात प्रभास व अनुष्का दोघांनीही या बातम्या कायम नाकारल्या. आम्ही कुठल्याही कमिटमेंटमध्ये नाही, हे दोघांनीही स्पष्ट केले. अर्थात तरिही या दोघांच्या लिंकअपच्या चर्चा थांबलेल्या नाहीत.  अलीकडे तर अनुष्का एका टीपिकल प्रेयसीसारखी वागू लागलीयं आणि  कथित बॉयफ्रेन्ड प्रभासबदद्ल ती बरीच पसेसिव्ह झालीय, असेही ऐकीवात आले होते.  आता अनुष्का व प्रभासमध्ये नक्की काय सुरु आहे, ते ठाऊक नाही. पण चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलो आहोत. होय, प्रभासच्या लग्नाकडे डोळे लावून बसलेल्या चाहत्यांसाठी ही बातमी आहे.

बातमी खरी मानाल तर, प्रभास यंदा लग्न करू शकतो. तेलगू इंडस्ट्रीचे लोकप्रीय अभिनेते कृष्णम राजू यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. कृष्णम राजू हे प्रभासचे काका आहेत. अलीकडे एका मुलाखतीत त्यांना प्रभास कधी लग्न करणार, असे विचारले गेले. यावर कृष्णम यांनी मोठा खुलासा केला. प्रभास कधी लग्न करणार, हे मला प्रत्येक मुलाखतीत विचारले जाते. आज मात्र मी याचे उत्तर देणारचं. प्रभास याचवर्षी लग्न करतोय. त्याची स्वत:चीही या वर्षी लग्न करण्याची इच्छा होती, असे त्यांनी सांगितले.

ALSO READ : नव्या चित्रपटाची नाही तर प्रभास करतोय निवृत्तीची प्रतीक्षा!

प्रभासच्या काकांनी दिलेली ही बातमी फिल्म इंडस्ट्रीत आगीसारखी पसरतेय. सध्या प्रभास ‘साहो’ या चित्रपटात बिझी आहे.  यात प्रभासच्या अपोझिट दिसणार आहे ती श्रद्धा कपूर. या चित्रपटात प्रभास दमदार अ‍ॅक्शन करताना दिसणर आहे. विशेष म्हणजे या अ‍ॅक्शन सीन्ससाठी बॉडी डबल घेण्यास प्रभासने नकार दिला आहे. त्यामुळे प्रभास स्वत: सगळे स्टंट सीन्स करतोय.  
Web Title: 'Bahubali' will you ever celebrate Prabhas? Uncle disclosed!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.