कॅन्सरमुळे ताहिरा कश्यपची झाली होती अशी अवस्था, आयुषमानपासून होणार होती विभक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 16:04 IST2020-01-21T16:03:47+5:302020-01-21T16:04:18+5:30
आयुषमान खुराणा व ताहिरा कश्यपने १२ वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर २००८ साली लग्न केले.

कॅन्सरमुळे ताहिरा कश्यपची झाली होती अशी अवस्था, आयुषमानपासून होणार होती विभक्त
बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराणा सध्या सातवे आसमान पर आहे. त्याचे शुभ मंगल सावधान, अंधाधुन, बधाई हो व बाला हे चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. आयुषमानच्या यशस्वी कारकीर्दीत त्याची पत्नी ताहिरा कश्यपचा देखील मोलाचा वाटा आहे. एकेकाळी त्यांनी खूप वाईट काळही अनुभवला आहे. आज ताहिराचा वाढदिवस आहे.
ताहिरा कश्यपने कॅन्सरवर यशस्वी मात केली आहे. तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. तिचे सगळे केस गळले होते. हा काळ होता जेव्हा आयुषमान करियरच्या यशाच्या शिखरावर होता. या कठीण समयीदेखील दोघांनी एकमेकांची साथ सोडली नाही. ताहिराने कर्करोगावर मात केली आणि आयुषमानने बॉलिवूडमध्ये टॉपचा अभिनेता झाला.
आयुषमान खुरानाला वयाच्या १६ वर्षांपूर्वी ताहिरा कश्यपवर प्रेम जडले होते. १२ वर्षांच्या रिलेशनशीपनंतर दोघांनी २००८ साली लग्न केले. ताहिराने एका मुलाखतीत सांगितलं की, एकवेळ असा आला होता ज्यावेळी ती नाते संपवून टाकणार होती.
एका मुलाखतीत ताहिराने सांगितले होते की, आयुषमानची ऑनस्क्रीन किस मला आवडत नव्हती. त्यावेळी मला खूप विचित्र वाटत होते. त्या दिवसांत मी प्रेग्नेंट होती त्यावेळी तुमची हार्मोन्स वरखाली होतात. आयुषमानला मला ऐकून घेण्यासाठी वेळदेखील नव्हता आणि माझ्याकडेदेखील त्याला समजून घेण्यासाठी वेळ नव्हता.
आम्ही एकत्र असून एकमेकांच्या जवळ नव्हतो. त्याला वाटायचे की मला वाईट नाही वाटणार. मला माहित होते की तो मला फसविणार नाही. मला फक्त एका कलाकाराची कला समजून घ्यायची होती.
ताहिराने पुढे सांगितले की, माझ्या जीवनात असे एक वळण आले होते त्यावेळी मी नाते संपवून टाकणार होती. कित्येकदा मी माझ्या मनाची तयारी केली होती. मी विचार करत होते की आता नाते आणखीन पुढे नाही जाऊ शकत. मी कित्येकदा त्यासाठी प्रयत्न केले पण आयुषमानने नाही. त्याने माझी साथ कधीच सोडली नाही. मी कॅन्सरशी सामना केला आणि दोघांनी ही लढाई जिंकली.