असा नवरा सुरेख बाई ! आयुषमानने आपल्या पत्नीसाठी केलं असं काही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 16:22 IST2019-10-18T16:14:00+5:302019-10-18T16:22:04+5:30
आयुषमानचे पत्नी ताहिरा कश्यपवर खूप प्रेम आहे ही गोष्ट जगजाहीर आहे.

असा नवरा सुरेख बाई ! आयुषमानने आपल्या पत्नीसाठी केलं असं काही
गुरुवारी झालेल्या करवाचौथ देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बॉलिवूड अभिनेत्रींनीही पतीच्या दीघार्युष्यासाठी हे व्रत केले. मात्र या सगळ्यात अभिनेता आयुषमान खुराणाने सगळ्यांची मनं जिंकली आहेत.
आयुषमानचे पत्नी ताहिरा कश्यपवर खूप प्रेम आहे ही गोष्ट जगजाहीर आहे. आयुषमान तिच्यावरचे प्रेम वेळोवेळी व्यक्त करत असतो. ताहिराने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओच्या माध्यमातून आयुषमानने तिच्यासाठी व्रत ठेवल्याचे सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून ताहिरा कॅन्सरवर उपचार घेते आणि त्यामुळे तिला करवाचौथचे व्रत ठेवता आले नाही. अशा स्थिती आयुषमानने पत्नीच्या दीघार्युष्यासाठी हे व्रत केले.
या व्हिडीओसोबत तिने एक कॅप्शनसुद्धा लिहिले आहे, मी दुबईमध्ये इथं एका इव्हेंटसाठी आले आहे आणि माझा पती आयुषमान तिकडे सिनेमाच्या सेटवर व्रत केले आहे. औषध अजून सुरु असल्याने मी हे व्रत नाही ठेऊ शकले. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.
काही दिवसांपूर्वी एका मुलाखती दरम्यान त्यांने सांगितले होते की, मला नाही माहिती हा ब्रेक कित्ती मोठा असले. कदाचित तो 2 ते 3 महिन्यापेक्षा जास्त मोठा पण असू शकतो. गेल्या वर्षी आणि या वर्षी मी लागोपाठ चार सिनेमांचे शूटिंग केले आहे. माझ्यासाठी हे सगळं खूप कठीण होते. मला कामाला आणि कुटुंबाला एकत्र घेऊन चालायंच आहे. याच कारणामुळे मी नोव्हेंबरपासून कामातून ब्रेक घेणार आहे. हा वेळ मला कुटुंबीयांना द्यायचा आहे.