नवीन वर्ष आयुषमान खुराणासाठी ठरणार खास; 'या' चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 15:26 IST2025-01-05T15:20:54+5:302025-01-05T15:26:04+5:30
आयुषमान खुराणा बॉलिवूडमधील सर्वांत बहुगुणी सुपरस्टार्सपैकी एक आहे.

नवीन वर्ष आयुषमान खुराणासाठी ठरणार खास; 'या' चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
New Year 2025 : नवीन वर्ष 2025 सुरू (New Year 2025) झालं आहे. हे नववर्ष अभिनेता आयुषमान खुराणासाठी खास ठरणार आहे. यंदा त्याचे काही खास सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकतंच त्याच्या 'थामा' सिनेमाचं दुसरं शेड्यूल सुरू झालं आहे. मॅडॉक फिल्म्सच्या ब्लॉकबस्टर हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधील हा चित्रपट पहिलं शेड्यूल मागील वर्षी मुंबईत पूर्ण झालं होतं. आथा दिल्लीत 'थामा'चं शूटिंग सुरू झालं आहे.
राजधानी दिल्लीमध्ये 'थामा'मधील काही रोमांचक सीन्स शूट केले जाणार आहेत, ज्याची शूटिंग जानेवारीच्या फर्स्ट हॉफ पर्यंत चालणार आहे. 'थामा' हा दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. 'थामा'मध्ये एक रोमांचक प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. ज्यात प्रेम आणि रक्तरंजित थरार दिसेल.
चित्रपटात आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत, तर परेश रावल आणि नवाजुद्दीन सिद्दीकी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ब्लॉकबस्टर मुंजा फेम आदित्य सर्पोतदार यांनी केलं आहे. निरेन भट्ट, सुरेश मॅथ्यू आणि अरुण फुलारा यांनी कथा लिहिली असून,दिनेश विजन आणि अमर कौशिक यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
'थामा' शिवाय अभिनेत्याकडं एक अॅक्शन थ्रिलर सिनेमादेखील आहे. तसेच त्याला सूरज बडजात्या यांच्या आगामी सिनेमात काम करण्याची संधी मिळाली आहे. आयुषमान खुराणा बॉलिवूडमधील सर्वांत बहुगुणी सुपरस्टार्सपैकी एक आहे. 2025 हे निश्चितच त्याच्या चाहत्यांसाठी आणि इंडस्ट्रीसाठी लक्षवेधी वर्ष ठरणार आहे.