बॉलिवूडचा हा अभिनेता चित्रपटाच्या सक्सेसनंतर झाला शर्टलेस, व्हायरल झाला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 13:48 IST2019-09-18T13:47:21+5:302019-09-18T13:48:05+5:30
बॉलिवूडचा हा अभिनेता सध्या यशाच्या शिखरावर आहे.

बॉलिवूडचा हा अभिनेता चित्रपटाच्या सक्सेसनंतर झाला शर्टलेस, व्हायरल झाला फोटो
बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना सध्या यशाच्या शिखरावर आहे. नुकताच त्याचा ड्रीम गर्ल चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याने करमवीर सिंगची भूमिका साकारली आहे. मागील दोन वर्षांपासून तो सातत्याने हिट चित्रपट दिले आहे. त्याची गिनती बॉलिवूडच्या चांगल्या अभिनेत्यांमध्ये होते. आयुषमान खुरानाने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे चर्चेत आला आहे.
आयुषमानने सोशल मी़डियावर त्याचा शर्टलेस फोटो शेअर केला आहे. ज्यात तो रूमच्या खिडकीतून समुद्राकडे पाहत आहे. हा फोटो शेअर करून आयुषमानने एक सुंदर कविता लिहिली आहे.
आयुषमान खुरानाने विकी डोनर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याने स्पर्म डोनरची भूमिका केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्याने बरेली की बर्फी, अंधाधुन, बधाई, शुभ मंगल सावधान, आर्टिकल १५, दम लगा के हईशा या चित्रपटातील दमदार भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
ड्रीम गर्ल चित्रपटात आयुषमान खुरानाने करमवीर सिंगची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली आहे.
या चित्रपटात आयुषमानसोबत नुशरत भरूचा मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाने ४ दिवसांत ५० कोटींचा आकडा पार केला.
हा कॉमेडी चित्रपट असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे.