पत्नीला पुन्हा कर्करोग झाल्याचं समजताच आयुषमान खुरानाची पहिली प्रतिक्रिया समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 10:37 IST2025-04-08T10:36:18+5:302025-04-08T10:37:05+5:30

ताहिरा कश्यपला पुन्हा एकदा कॅन्सरचं निदान झालं आहे.

Ayushmann Khurrana Reacts To Wife Tahira Kashyap's Breast Cancer Relapse After Seven Years | पत्नीला पुन्हा कर्करोग झाल्याचं समजताच आयुषमान खुरानाची पहिली प्रतिक्रिया समोर

पत्नीला पुन्हा कर्करोग झाल्याचं समजताच आयुषमान खुरानाची पहिली प्रतिक्रिया समोर

Tahira Kashyap's Breast Cancer: बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाची (Ayushmann Khurrana) पत्नी ताहिरा कायम चर्चेत (Tahira Kashyap) असतात. ७ वर्षांपूर्वी ताहिराला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा तिला कॅन्सर झाल्याचं समोर आलं आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. या कठीण काळात ताहिराला तिचे मित्रमैत्रिणी आणि चाहते धीर देत आहेत. आपली पत्नी पुन्हा  ब्रेस्ट कॅन्सरची शिकार झाल्याचं कळाल्यावर आयुषमानची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

ताहिराने कॅन्सरबद्दल माहिती देताना पोस्टमध्ये लिहलं, "७ वर्ष नियमित स्क्रीनिंग केल्यानंतर...हा एक दृष्टिकोन आहे. मला पुन्हा त्यासोबत जायचं आहे. मी सर्वांना हेच सुचवेन की नियमित मॅमोग्राम करा. माझा राऊंड-२ सुरू झाला आहे. मी तरी यासाठी तयार आहे", या आशयाची पोस्ट तिने केली आहे. ताहिराने तिच्या पोस्टसोबत #onemoretime असंही लिहलं. गेल्यावेळेस प्रमाणे आताही आयुषमान ताहिराच्या साथीला आहे. 

आयुषमानने ताहिराच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आणि कमेंट सेक्शनमध्ये एक नोट लिहिली. यात शब्द कमी असतील, पण भावनाचं मोल जास्त आहे.  "माझी हिरो",असं म्हणत त्याने रेड हॉर्ट एमोजी पोस्ट केलेत. ताहिराला २०१८ मध्ये पहिल्यांदाच स्तनाचा कर्करोग झाला होता. त्यावर तिने यशस्वीरित्या मात केली होती. आता पुन्हा कर्करोगाला लढा देण्यासाठी ती सज्ज आहे. ताहिरा ही एक लेखिका आणि दिग्दर्शक देखील आहे. 

 

Web Title: Ayushmann Khurrana Reacts To Wife Tahira Kashyap's Breast Cancer Relapse After Seven Years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.