Ayushmann Khurrana Father Dies : आयुषमान खुरानाच्या वडिलांचं निधन, रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला शेवटचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 16:12 IST2023-05-19T16:09:12+5:302023-05-19T16:12:46+5:30
Ayushmann Khurrana Father Dies: बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाचे वडील प्रसिद्ध ज्योतिषी पी खुराना यांचे आज सकाळी चंदीगड येथे निधन झाले.

Ayushmann Khurrana Father Dies : आयुषमान खुरानाच्या वडिलांचं निधन, रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला शेवटचा श्वास
प्रसिद्ध ज्योतिषी पी खुराना यांचे आज सकाळी चंदीगड येथे निधन झाले. ज्योतिष पी खुराना हे चित्रपट अभिनेता आयुष्मान खुरानाचे वडील होते. आज सायंकाळी साडेपाच वाजता चंदीगड येथील मणिमाजरा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या २ दिवसांपासून पी खुराना यांना पंजाबमधील मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हृदयविकारामुळे त्यांच्यावर २ दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते.
आयुषमान खुराना त्याच्या वडिलांच्या खूप जवळ होता. त्याचे वडील पी खुराना यांनीच अभिनेत्याच्या नावाचे स्पेलिंग बदलले आणि त्याला चित्रपटसृष्टीत येण्यास सांगितले. वडिलांना माहित होते की मुलगा आयुषमानची कारकीर्द इंडस्ट्रीमध्ये खास आणि यशस्वी होणार आहे. अशा परिस्थितीत वडिलांचा आशीर्वाद घेऊन अभिनेत्याने चित्रपट प्रवासाला सुरुवात केली.
शिल्पा धर यांना दिला वारसा
२०२१ मध्ये ज्योतिषी पी खुराना यांनी शिल्पा धर यांना त्यांचा वारसा दिला. यादरम्यान त्यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितले होते की, त्यांचा वारसा मिळविण्यासाठी किती लोकांनी रस दाखवला होता, पण त्यांच्या हृदयाला कोणी स्पर्श करू शकले नाही. यानंतर शिल्पा त्यांना भेटली, ज्यांनी त्यांना प्रभावित केले. पी खुराणा म्हणाले होते की, शिल्पा यांनी निस्वार्थ भावनेने त्यांच्या गुरूच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. त्यामुळेच आपण शिल्पा धर यांना आपला वारसा देऊ शकतो असे त्यांना वाटले.
मुलाखतीत आयुषमानने सांगितले होते वडिलांबद्दल
आयुषमान खुरानाचे त्याच्या वडिलांसोबत खूप घट्ट नाते होते. करिअरच्या सुरुवातीचे श्रेयही तो त्याच्या वडिलांना देतो. आयुष्मानने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याला चंदीगडमध्ये राहायचे होते, पण त्याचे वडील पी जखुराना यांनी त्याला मुंबईला आणले होते. त्याच्या वडिलांनी मुंबईत जाऊन कोणाला तरी सांगितले होते की आपला मुलगा एक दिवस मोठा स्टार बनेल. आयुषमानला याची माहिती नव्हती. मात्र, नंतर कळल्यावर वडिलांच्या अपेक्षा पूर्ण नाही झाली तर काय होईल, अशी भीती वाटू लागली होती.
अभिनेत्याने दुसऱ्या एका मुलाखतीत सांगितले की, त्याचे वडील लहानपणी खूप कडक होते. वडिलांकडून त्याने खूप मार खाल्ला आहे. ज्यांनी आई-वडिलांचा ओरडा आणि मार खाल्ला नाही, त्यांचे चांगले संगोपन होणार नाही.