आयुषमान खुराणाच्या 'डॉक्टर जी'मध्ये झाली रकुल प्रीत सिंगची एंट्री, अभिनेत्रीने सांगितली तिची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 15:47 IST2021-02-01T15:41:50+5:302021-02-01T15:47:17+5:30
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग ‘डॉक्टरजी’ या सिनेमात आयुषमानच्या अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे.

आयुषमान खुराणाच्या 'डॉक्टर जी'मध्ये झाली रकुल प्रीत सिंगची एंट्री, अभिनेत्रीने सांगितली तिची भूमिका
डिसेंबर २०२० मध्ये आयुषमान खुराणाने जाहीर केले की तो आपल्या पुढच्या सिनेमात मेडिकल प्रोफेशनला एक्स्प्लोर करणार आहे. आयुषमानने आपल्या ‘डॉक्टर जी’ या नव्या चित्रपटाच्या स्क्रिप्टसह एक फोटो शेअर केला आणि सांगितले की लवकरच आपले क्लिनिक उघडणार आहे. आयुषमानच्या या नव्या चित्रपटात त्याच्या अपोझिट कोणती अभिनेत्री झळकणार हे आता ठरलं आहे. अभिनेत्री रकुल प्रीत सिंग ‘डॉक्टरजी’ या सिनेमात आयुषमानच्या अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे.
रकुल आणि आयुषमान 'डॉक्टरजीं' सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. या चित्रपटामध्ये आयुषमान डॉक्टर उदय गुप्ताची भूमिका साकारत असल्याची बातमी आहे तर रकुल त्याच्या कॉलेजमधील सीनिअर फातिमाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचा भाग झाल्यामुळे रकुल खूप आनंदित आहे. बॉम्बे टाईम्सशी बोलताना रकुल प्रीत सिंग म्हणाली की, ''डॉक्टरजींचा भाग होण्यासाठी मी खूप उत्साही आहे.''
रकुल म्हणाली, हा आयुषमानसोबत माझा पहिला चित्रपट आहे. आम्ही दोघांना एकत्र आणल्याबद्दल जंगल पिक्चर्स आणि अनुभूती कश्यप यांची मी आभारी आहे. जेव्हापासून मी या चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकली आहे तेव्हापासून मी तिच्या प्रेमात पडलो आहे. ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. जी मेडिकल प्रोफेशनच्या अवती- भवती फिरते आहे. मी चित्रपटाची शूटिंग सुरू होण्याची अजून वाट पाहू शकत नाही. ''