आयुष शर्माने ‘या’ अभिनेत्रीशी रोमान्स करण्यास दिला नकार; सलमान खानची वाढली डोकेदुखी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 18:34 IST2017-09-15T12:42:16+5:302017-09-15T18:34:02+5:30
आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की, सलमान खानची बहीण अर्पिता खानचा पती आयुष शर्मा याला लवकरच सलमान लॉन्च करणार आहे. ...

आयुष शर्माने ‘या’ अभिनेत्रीशी रोमान्स करण्यास दिला नकार; सलमान खानची वाढली डोकेदुखी!
आ ल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की, सलमान खानची बहीण अर्पिता खानचा पती आयुष शर्मा याला लवकरच सलमान लॉन्च करणार आहे. यासाठी सलमानने पूर्ण प्लॅनिंगही केले आहे. आपल्याच प्रॉडक्शन हाउसच्या एका रोमॅण्टिक चित्रपटातून आयुषला इंडस्ट्रीत लॉन्च केले जाण्याची तयारी केली जात आहे. परंतु असे करीत असतानाच सलमानसमोर आता एक अडचण निर्माण झाली आहे. सलमान आयुषच्या चित्रपटात अभिनेत्री मौनी रॉय हिला संधी देऊ इच्छित होता. परंतु आता समोर आलेल्या माहितीनुसार, आयुषने मौनीसोबत स्क्रीन शेअर करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.
डेक्कन क्रॉनिकलच्या वृत्तानुसार, आयुष शर्मा, मौनी रॉयसोबत चित्रपट करण्यास तयार नाही. त्याला त्याच्या डेब्यू चित्रपटात मौनी रॉयसोबत रोमान्स करायचा नाही. तर आयुषच्या इच्छेनुसार त्याच्या पहिल्याच चित्रपटात बॉलिवूडची एखादी मोठी अदाकारा असायला हवी. नव्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करण्यास आयुष फारसा उत्सुक नाही. आता आयुषची ही इच्छा सलमान खानसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
![]()
आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की, मौनी रॉय आणि सलमान खान खूप चांगले मित्र आहेत. त्यामुळे मौनीला नकार देणेही सलमानला अवघड होणार आहे. अशात सलमान यातून काय मार्ग काढणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. एकीकडे बहिणीच्या पतीची इच्छा, तर दुसरीकडे चांगली मैत्रिण अशा द्विधा मन:स्थितीत सलमान खान अडकला आहे.
खरं तर आयुष शर्माच्या चित्रपटात अडचणी येत असल्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. यापूर्वीदेखील त्याच्या डेब्यू चित्रपटाविषयी अडचणी उद्भवल्या आहेत. सर्वांत अगोदर निर्माता तथा दिग्दर्शक करण जोहर आयुषला लॉन्च करणार होता. मात्र काही कारणामुळे त्याने माघार घेतली. त्यानंतर अशी चर्चा रंगली होती की, सलमानची एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफची बहीण आयुषच्या चित्रपटात झळकणार आहे. मात्र यावर अधिकृतरीत्या कुठलीही माहिती समोर आली नसल्याने ही चर्चा हवेतच राहिली. आता मौनी रॉयचे नाव पुढे आले आहे. मात्र आता त्यातही विघ्न येताना दिसत आहे. अशात सलमान यातून काय मार्ग काढतो हे बघणे मजेशीर ठरेल. ठरेल.