​आयशा टाकिया झळकणार म्युझिक व्हिडिओमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2017 16:47 IST2017-02-21T11:12:23+5:302017-02-22T16:47:47+5:30

आयशा टाकियाने टार्झनः द वंडर कार या चित्रपटाद्वारे स्वतःच्या कारकिर्दीला सुरुवात केली. वाँटेड या चित्रपटातील सलमान खानसोबतची तिची केमिस्ट्री ...

Ayesha Takia will be seen in a music video | ​आयशा टाकिया झळकणार म्युझिक व्हिडिओमध्ये

​आयशा टाकिया झळकणार म्युझिक व्हिडिओमध्ये

शा टाकियाने टार्झनः द वंडर कार या चित्रपटाद्वारे स्वतःच्या कारकिर्दीला सुरुवात केली. वाँटेड या चित्रपटातील सलमान खानसोबतची तिची केमिस्ट्री खूपच गाजली होती. पण व्यवसायिक रहान आझमीसोबत लग्न केल्यानंतर ती चित्रपटांपासून दूर गेली. तिने आप के लिये हम या 2013 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात शेवटचे काम केले होते. तिला मुलगा झाल्यानंतर तर ती संपूर्णपणे संसारातच रमली. पण आता ती लवकरच परतणार असल्याचे म्हटले जात आहे. 
आयशाने डिसेंबर महिन्यात एका म्युझिक व्हिडिओचे चित्रीकरण केल्याची चर्चा आहे. या म्युझिक व्हिडिओची सगळी गाणी अमित मिश्राने गायली असून हा म्युझिक व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीस कधी येणार हे अद्याप ठरलेले नाही. हा म्युझिक व्हिडिओ या वर्षीच्या मध्यापर्यंत प्रदर्शित होईल असे म्हटले जात आहे. 
2013मध्ये आई झाल्यानंतर ती कॅमेऱ्यासमोर दिसली नव्हती. पण आता एका म्युझिक व्हिडिओमध्ये ती थिरकणार असून याचे चित्रीकरण दक्षिण मुंबईत ख्रिसमसमध्ये करण्यात आले आहे. या व्हिडिओचे सध्या एडिटिंग सुरू असून याचे चित्रीकरण करण्यास दोन दिवस लागले होते. या व्हिडिओमधील तिचा कॉश्च्युम तिच्या आईने बनवला असल्याचे कळतेय. या चित्रीकरणाच्यावेळी तिचा मुलगा मिखैलदेखील उपस्थित होता. ख्रिसमस सुरू असल्याने तो सांताक्लोज बनून सेटवर आला असल्याचीदेखील चर्चा आहे. या प्रोजेक्टसाठी तिला या व्हिडिओचे दिग्दर्शक लवली सिंह यांनी तयार केले. याविषयी ते सांगतात, "आयशाला या म्युजिक व्हिडिओसाठी तयार करणे आमच्यासाठी सोपे नव्हते. त्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली. तिला चित्रपट करण्याची इच्छा आहे. तसेच चांगल्या ऑफर्सची ती वाटदेखील पाहात आहे. पण ती सध्या तिच्या मुलाला प्राधान्य देत असल्याने चित्रपटांमध्ये झळकत नाहीये. आमच्या प्रोजेक्टला केवळ दोन दिवस लागणार असल्याने तिने या म्युझिक व्हिडिओमध्ये काम करण्यास होकार दिला." 

Web Title: Ayesha Takia will be seen in a music video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.