‘नीरजा’ बघायचे टाळतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 00:58 IST2016-02-20T07:58:40+5:302016-02-20T00:58:40+5:30

सोनम कपूर आणि अर्जुन कपूर हे चुलत भावंड. बॉलीवूडमध्ये सोनम अर्जुनला सिनिअर. तिच्या ‘नीरजा’ या चित्रपटाबाबत सर्वत्र उत्सुकता आहे. ...

Avoid seeing 'Neerja' | ‘नीरजा’ बघायचे टाळतो

‘नीरजा’ बघायचे टाळतो

ong>सोनम कपूर आणि अर्जुन कपूर हे चुलत भावंड. बॉलीवूडमध्ये सोनम अर्जुनला सिनिअर. तिच्या ‘नीरजा’ या चित्रपटाबाबत सर्वत्र उत्सुकता आहे. अर्जुन मात्र हा चित्रपट बघायचे शक्यतो टाळणार असल्याचे सांगतो. याला कारण म्हणजे, जवळच्या व्यक्तींना गमावणे त्याला भयावह वाटते. 

‘निरजा’ चित्रपटात सोनमचा मृत्यू होतो, असे दाखवण्यात आले आहे. पडद्यावर का होईना, लाडकी बहीण मृत्युमुखी पडलेली बघणे अर्जुनला पाहवणार नाही. यामुळे तो हा चित्रपट पाहणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. खुद्द अर्जुनने टिष्ट्वटरद्वारे ही माहिती दिली. सप्टेबर 1986 मध्ये दहशतवाद्यांनी विमान हायजॅक केल्यानंतर एयर होस्टेस असलेल्या निरजा भानोतने आपला जीव गमावून प्रवाशांचे प्राण वाचवले होते.

अर्जुन हा चित्रपट पहायला घाबरत असला तरी, सोनमने असा चित्रपट निवडल्याबद्दल त्याने तिचे अभिनंदन केले. तो म्हणाला, ‘‘सोनमने ‘निरजा’सारखा साहसी चित्रपट स्वीकारला, याबद्दल मला तिचा अभिमान वाटतो. प्रत्येक चित्रपटागणिक सोनमचे यश अधिकाधिक ठळक होत आहे. भविष्यातही ही वाटचाल कायम राहावी, यासाठी तिला माझ्या शुभेच्छा आहेत.’’ राम माधवणी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती फॉक्स स्पोर्ट्स स्टुडिओने केली असून ब्लिंग अनप्लग्ड त्याचे सहनिर्माते आहेत.

Web Title: Avoid seeing 'Neerja'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.