पाकिस्तानी डिझायनरला भारतीय अभिनेत्यानं दिलं खणखणीत उत्तर, सोशल मीडियावर होतंय ट्रेंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 11:18 IST2025-07-27T11:10:04+5:302025-07-27T11:18:13+5:30
भारतीय अभिनेत्यानं पाकिस्तानी डिझायनरची केली बोलती बंद, नेमकं काय घडलं?

पाकिस्तानी डिझायनरला भारतीय अभिनेत्यानं दिलं खणखणीत उत्तर, सोशल मीडियावर होतंय ट्रेंड
Avinash Tiwary slams Pakistani Costume Designer: अभिनेता अविनाश तिवारी हा आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. 'लैला मजनू', 'खाकी: द बिहार चॅप्टर' आणि 'बॉम्बे मेरी जान'सारख्या वेब सिरीजमधून त्याने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. मात्र अलीकडेच त्याच्यावर पाकिस्तानी कॉस्च्युम डिझायनर राव अली खानने बॉडी शेमिंग करत टिप्पणी केली. विशेष म्हणजे, या टीकेला अविनाशने शांत, सभ्य पण प्रभावी उत्तर देत अनेकांचं मन जिंकलं आहे.
काही दिवसांपूर्वी राव अली खाननं अविनाशच्या एका इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट करत त्याच्या शरीरावर टीका केली. त्यांनी म्हटलं, "'बॉम्बे मेरी जान' सीरिज खूप आवडली, पण 'खाकी' आणि 'बॉम्बे मेरी जान' या दोन्ही मालिकांमध्ये त्याच्या पोटाजवळ थोडी चरबी होती, ती पाहून थोडं आश्चर्य वाटलं. आता त्याला फिट अवस्थेत पाहून बरं वाटतं". या टीकेला उत्तर देताना अविनाश तिवारीने लिहिलं, "सर, आपण एक पत्रकार आहात. जर आपण थोडं संशोधन केलं असतं, तर कळलं असतं की हा लुक पात्राच्या मागणीनुसार होता. माझा सल्ला आहे की फक्त दिखाव्यावर न जाता सिनेमाच्या खोल अर्थाकडेही लक्ष द्या. धन्यवाद".
राव अली खाननं त्यानंतर पुन्हा एकदा अविनाशला वजन कमी करण्याचा सल्ला देत म्हटलं की तो अधिक चांगला आणि फिट दिसेल. यावर अविनाशने केवळ दोन शब्दांत प्रतिक्रिया दिली ,"ओके सर." त्याचं हे संयमी आणि सुसंस्कृत उत्तर अनेक चाहत्यांना भावलं. सोशल मीडियावर अविनाशच्या या उत्तराचं भरभरून कौतुक केलं जात आहे. अनेकांनी लिहिलं की कलाकाराने त्याच्या भूमिकेनुसार लूक बदलणं ही अभिनयाची गरज असते. काहींनी राव अली खानलाही सुनावत म्हटलं की इतरांच्या शरीरावर टिप्पणी करण्याऐवजी स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करावं.