अभिनेता इमरान खानची पत्नी अवंतिका मलिकचा मोठा खुलासा, वर्षभरापासून राहतायेत वेगळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 14:49 IST2020-04-18T14:37:25+5:302020-04-18T14:49:50+5:30
अभिनेता इमरान खान आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक गेल्या एक वर्षांपासून एकमेकांपासून वेगळे राहत आहेत.

अभिनेता इमरान खानची पत्नी अवंतिका मलिकचा मोठा खुलासा, वर्षभरापासून राहतायेत वेगळे
अभिनेता इमरान खान आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक गेल्या एक वर्षांपासून एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत्या. अवंतिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे ज्याच्यावरुन असा अंदाज लावण्यात येतो आहे की दोघे आपल्या नात्याला सुधारण्याच्या प्रयत्नात आहेत.
अवंतिका गेल्या काही दिवसांपासून काही वेगळ्याच पोस्ट सोशल मीडियावर शेअर करते आहे. आता अवंतिताने मुलगी इमारासोबतचा फोटो शेअर केला आहे.
या फोटोला अवंतिकाने एक कॅप्शन दिले आहे ज्यावरून असा अंदाज लावण्यात येतो आहे की ती इमरान आणि तिच्या नात्याला एक संधी देऊ शकते. अवंतिका लिहिते, 'मी प्रेमासोबत जगण्याचा निर्णय घेतला आहे. द्वेष हा एक भारी भार आहे. अशा आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे.
‘जाने तू या जाने ना’ हा इमरानचा पहिला चित्रपट हिट झाला होता. त्यामुळे पाठोपाठ अनेक चित्रपटांत तो दिसला. पण यापैकी एकही चित्रपट हिट झाला नाही. २०१५ मध्ये त्याचा ‘कट्टी बट्टी’ प्रदर्शित झाला. तेव्हापासून तो एकाही चित्रपटात दिसला नाही. 2011 मध्ये अवंतिका आणि इमरान लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. दोघांना एक इमारा नावची मुलगी देखील आहे.