n lang="MR" style="font-family:Mangal,serif">90च्या दशकातील 'चाची-420' हा सिनेमा प्रत्येकाचाच आवडता सिनेमा.. या सिनेमात आपल्या लेकीसाठी काहीही करण्याची तयारी असलेला अभिनेता कमल हासन यांचा अभिनय सा-यांनाच भावला.. कमल हासन यांच्या लेकीची भूमिका साकारलेली ही चिमुकलीही भाव खाऊन गेली.. फातिमा सना शेख असं या तिचं नाव.. चाची-420 सिनेमानंतर फातिमा 'वन टू का फोर' या सिनेमातही लहानग्या फातिमानं काम केलं.. आता मात्र ही चिमुकली काही लहान राहिली नाही.. ती आता मोठी झालीय असून तितकीच ती सुंदरही दिसतेय आणि फातिमा रुपेरी पडद्यावर कमबॅक करतेय. फातिमाचं कमबॅक बॉलीवुडच्या बड्या अभिनेत्यासह.. मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खानसह रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. आगामी 'दंगल' या सिनेमात फातिमा आमिरच्या लेकीची भूमिका साकारतेय. चिमुकल्या फातिमाचा आताचा ग्लॅमरस अवतार सा-यांनाच तितकाच भावेल..