​ Audio Viral : तू मिल, मैं तेरा अंग भंग कर दूंगा...भोजपुरी सुपरस्टार दिनेश लाल यादवची पत्रकारास धमकी !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 13:27 IST2018-06-19T07:51:39+5:302018-06-19T13:27:59+5:30

भोजपुरी सुपरस्टार दिनेश लाल यादव ऊर्फ निरहुआ सध्या एका वादात सापडला आहे. होय, पत्रकार शशिकांत यांनी निरहुआवर अश्लिल शिव्या ...

Audio Viral: Tu Mill, I will break your limbs ... Bhojpuri superstar Dinesh Lal Yadav's journalist threat !! | ​ Audio Viral : तू मिल, मैं तेरा अंग भंग कर दूंगा...भोजपुरी सुपरस्टार दिनेश लाल यादवची पत्रकारास धमकी !!

​ Audio Viral : तू मिल, मैं तेरा अंग भंग कर दूंगा...भोजपुरी सुपरस्टार दिनेश लाल यादवची पत्रकारास धमकी !!

जपुरी सुपरस्टार दिनेश लाल यादव ऊर्फ निरहुआ सध्या एका वादात सापडला आहे. होय, पत्रकार शशिकांत यांनी निरहुआवर अश्लिल शिव्या तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप  केला आहे. दिनेश लाल यादव संबंधित पत्रकारास आक्षेपार्ह शिव्या देत असतानाची आॅडिओ टेप सध्या व्हायरल होत आहे. आॅडिओ व्हायरल झाल्यानंतर साहजिकचं दिनेश लाल यादवची प्रतिक्रियाही समोर आली आहे. मी कुठल्याही स्थितीत माफी मागणार नाही, असे त्याने म्हटले आहे.
‘तू मुझे मिल, मैं तेरा अंग भंग कर दूंगा. हम खून पसीने की कमाई से फिल्म बनाते है और तुम ऐसी निगेटीव्ह खबरें फैलाते हो़ तुम्हे घर में घुसकर मारूंगा,’ असे निरहुआ या आॅडिओ टेपमध्ये म्हणतो आहे.
दरम्यान निरहुआविरोधात शशिकांत यांनी पोलिस तक्रार केली आहे़.यासंदर्भात एका वाहिनीला मुलाखत देताना निरहुआ याने आपली बाजू मांडली. होय, मी चुकलो़ मी पोलिसांची मदत घ्यायला हवी होती. या पत्रकाराला मी दोन वर्षांपासून सहन करत होतो. त्याने माझ्या चित्रपटाबद्दल खोटी माहिती पेरली. माझा चित्रपट हाऊसफुल सुरु असताना  तो त्याबद्दल खोट्या बातम्या लिहितोय. मी त्याबद्दल जाब विचारण्यासाठी त्याला फोन केला होता. पण त्यावेळी माझी मानसिक स्थिती ठीक नव्हती. मी त्याच्याविरोधात केस ठोकणार. संपूर्ण भोजपूरी इंडस्ट्री त्याच्याविरोधात केस करेल. तो माझ्या चित्रपटाची नकारात्मक प्रसिद्धी करतोय. मी त्याची अजिबात माफी मागणार नाही, असे त्याने म्हटले आहे.
शशिकांत नामक या पत्रकारासोबत निरहुआच्या संवादाचा संपादीत भाग आम्ही खाली देत आहोत...

शशिकांत - हॅलो
निरहुआ - शशिकांतजी तुम्हाला वाटत नाही का, तुम्ही पातळी ओलांडत आहात़
शशिकांत - हॅलो...हॅलो...
निरहुआ - निरहुआ बोलतोय
शशिकांत - अरे बोल भावा, कसा आहेस
निरहुआ - तू अति करत नाहीयेस?
शशिकांत - काय झाले, मी काय करतोय? काय केले मी?
निरहुआ - तुला नाही वाटत तू अतिरेक करतोय.
शशिकांत - नाही, मी केवळ लिहितोय. त्यात काय चूक आहे. काही चूक असेल तर सांग मी तुझीही भूमिका मांडतो़
निरहुआ - सांगू का, तू भेट तऱ खाण्या-पिण्याच्या लायक उरणार नाही. तुझी पत्रकारिता तुझ्या ---- नाही टाकली तर ...(शिव्या)
शशिकांत - आता तू हे करणार?
निरहुआ - शिव्या देत, तू भेट तर... तुम्हे इतना काटुंगा न की अंग भंग कर दूंगा
शशिकांत - खरेचं. तू शिव्या देतो आहेस़ रेकॉर्डिंग होत आहे.
निरहुआ - फक्त मला बॉम्बेला पोहोचू दे. रक्त आटवून आम्ही चित्रपट बनवतो आणि तू निगेटीव्ह छापतोय. पोहोचू दे. तुझ्या घरात घुसून तुला मारले नाही तर बापाची औलाद नाही. खूप झाले़ केव्हापासून मी दुर्लक्ष करतोय.
शशिकांत - तू जे करतोय, ते तुला शोभते का
निरहुआ - तुला शोभा देतेयं का? पोलिसांत जा. पण तू वाचणार नाही. फक्त् मला पोहोचू दे...पुन्हा शिव्या...

ALSO READ :फाटलेली जीन्स बघून या सुपरस्टारची आई संतापली; म्हटले, ‘इतके कमावतोस तरी हे हाल!

Web Title: Audio Viral: Tu Mill, I will break your limbs ... Bhojpuri superstar Dinesh Lal Yadav's journalist threat !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.