लग्नाच्या फोटोंचा प्रिती करणार लिलाव !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 21:44 IST2016-02-20T04:10:25+5:302016-02-19T21:44:30+5:30

नुकतेच प्रिती झिंटाने टिष्ट्वटरवर जाहीर केले आहे की, ती जेने गुडनग याच्यासोबत काही दिवसांतच विवाहबद्ध होणार आहे. सोशल मीडियासह ...

Auction of wedding photos! | लग्नाच्या फोटोंचा प्रिती करणार लिलाव !

लग्नाच्या फोटोंचा प्रिती करणार लिलाव !

कतेच प्रिती झिंटाने टिष्ट्वटरवर जाहीर केले आहे की, ती जेने गुडनग याच्यासोबत काही दिवसांतच विवाहबद्ध होणार आहे. सोशल मीडियासह चाहत्यांमध्येही तिच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. हॉलीवूड कपल्स ब्रॅड पिट-अँजेलिना जोली, जॉर्ज क्लोनी-अमल अलामुद्दीन प्रमाणे प्रिती झिंटा आणि जेने गुडनग यांनी ठरवले आहे की, ते त्यांच्या लग्नाचे खासगी फोटो समाजसेवी संघटनांना देणार आहेत. सुत्रांनुसार, समाजातील आपण एक घटक आहोत. आपलेही समाजाप्रती काही कर्तव्ये आहेत हे समजून प्रीती आणि जेने यांनी ठरवले की, ज्या संस्थांमध्ये लहान मुलांना शिक्षण, अनाथाश्रम, वृद्धाश्रम  येथे त्या फोटोंना लिलावातून मिळालेली रक्कम दान करणार आहेत. प्रिती आणि जेने त्यांच्या आयुष्यातील हा सर्वांत महत्त्वाचा क्षण ते यापद्धतीने साजरा करू इच्छितात. ‘फुल ना फुलाची पाकळी’ म्हणत ते त्यांना शक्य आहे तसे समाजासाठी काही करू पाहत आहेत. वेल, खरंच छान. प्रिती आणि जेने. 

 लग्न कुठे आणि कधी ?
 प्रिती झिंटा - जेने गुडनग सोबत एप्रिलमध्ये लॉस एंजलिस येथील एका चर्चमध्ये विवाहबद्ध होणार असून मित्रमंडळी आणि आप्तस्वकीयांसमवेत हा सोहळा असणार आहे. लॉस एंजलिस मधील या खासगी सोहळयानंतर ते दोघे खास राजपूत पद्धतीने ग्रँड सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. हा राजपूत थाट खास तिच्या बॉलीवूडबाहेरील मित्रमंडळींसाठी असणार आहे. तिथे संगीत, मेहंदी लग्नविधी हे विधीवत तीन दिवस चालणार आहे. प्रिती झिंटाचे लग्नाचे ड्रेसेस हे मनिष मल्होत्रा किंवा सुरिली गोएल यांनी डिझाईन केलेले असणार आहेत. जेने ‘एनलाईन एनर्जी’ या कंपनीत वाईस प्रेसिडेंट फायनान्स या पदावर आहे. प्रिती जेव्हा यूएस येथील तिच्या भावाला भेटायला जात असे तेव्हा ती जेनेला तिथे भेटली.

Web Title: Auction of wedding photos!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.