Champions Trophy : टीम इंडिया चॅम्पियन ठरल्यानंतर अथिया शेट्टीने फ्लॉन्ट केला बेबी बंप, KL राहुलसाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 15:40 IST2025-03-10T15:39:32+5:302025-03-10T15:40:28+5:30

न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यात केएल राहुलने ३४ धावांची नाबाद खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर अथियाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन स्टोरी शेअर केली.

athiya shetty shared special post for kl rahul after india won champions trophy flaunts baby bump | Champions Trophy : टीम इंडिया चॅम्पियन ठरल्यानंतर अथिया शेट्टीने फ्लॉन्ट केला बेबी बंप, KL राहुलसाठी खास पोस्ट

Champions Trophy : टीम इंडिया चॅम्पियन ठरल्यानंतर अथिया शेट्टीने फ्लॉन्ट केला बेबी बंप, KL राहुलसाठी खास पोस्ट

टीम इंडियाने रविवारी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करत ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडिया चॅम्पियन ठरल्यानंतर देशभर एकच जल्लोष करण्यात आला. चॅम्पियन्स ट्ऱॉफीच्या फायनलनंतर अनेक सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर पोस्ट करत टीम इंडियाचं अभिनंदन केलं. अभिनेत्री अथिया शेट्टीने क्रिकेटर आणि पती केएल राहुलसाठी खास पोस्ट शेअर केली. 

न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यात केएल राहुलने ३४ धावांची नाबाद खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर अथियाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन स्टोरी शेअर केली. यामध्ये अथिया बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. मॅच खेळताना केएल राहुल आणि अथिया शेट्टी असा फोटो अभिनेत्रीने शेअर केला. हा फोटो शेअर करत तिने हार्टचे इमोजी पोस्ट केले आहेत. 


अथिया शेट्टी आणि केएल राहुलने काही दिवसांपूर्वीच आईबाबा होणार असल्याची गुडन्यूज दिली होती. लग्नानंतर एका वर्षातच त्यांच्या घरी पाळणा हलणार आहे. गेल्या वर्षी २३ जानेवारी रोजी अथिया आणि के एल राहुल यांनी लग्नगाठ बांधली.आता दोघंही आयुष्यातील नव्या इनिंगला सुरुवात करत आहेत. 

Web Title: athiya shetty shared special post for kl rahul after india won champions trophy flaunts baby bump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.