KL Rahul सोबत 3 महिन्यात Athiya Shetty बांधणार लग्नगाठ?, अभिनेत्री म्हणाली- या लग्नासाठी मला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 15:31 IST2022-07-13T14:36:24+5:302022-07-13T15:31:32+5:30
सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी (Athiya Shetty)ने आपल्या लग्नाच्या चर्चेवर मौनं सोडलं आहे.

KL Rahul सोबत 3 महिन्यात Athiya Shetty बांधणार लग्नगाठ?, अभिनेत्री म्हणाली- या लग्नासाठी मला...
अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि भारतीय क्रिकेटर के. एल. राहुल (K.L.Rahul) लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत. त्यांचा व्हेडिंग प्लानसुद्धा तयार असल्याचे म्हटले जात आहे. आता अशी माहिती समोर आली आहे की, पुढच्या तीन महिन्यात हे दोघे विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे.अथिया आणि केएल राहुल येत्या ३ महिन्यांत लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या गेल्या होत्या. आता स्वतः अभिनेत्रीने तिच्या लग्नाच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे.
अथिया शेट्टीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक स्टोरी शेअर केली. . एक पोस्ट शेअर करत अथियाने लिहिले - या लग्नासाठी मला आमंत्रित केले जाईल अशी आशा आहे, जे ३ महिन्यांत होणार आहे. यासोबतच तिने हसणारा इमोजीही शेअर केला आहे.
अथियाच्या लग्नावर सुनील शेट्टी काय म्हणाला?
अथिया शेट्टीपूर्वी तिचे वडील सुनील शेट्टी यांनी आपल्या मुलीच्या लग्नाच्या बातमीवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, अथियाच्या लग्नाचे कोणतेही नियोजन नाही आणि कोणतीही तयारी सुरू नाही.
अथिया आणि के. एल. राहुल यांचं नातं लपलेलं नाही. दोघंही एकमेकांच्या प्रेमात आहेत, हे जगजाहीर आहे. दोघेही सतत एकेमकांसोबत सुटीचा आनंद घेताना दिसून आले आहेत. आथिया लोकेश राहुलसोबत अनेक सामन्यांसाठी विदेश दौरा करत असते.