'आमच्याकडे लग्नाच्या तयारीला सुरुवात..'; अथियाच्या लग्नावर सुनील शेट्टीची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 16:38 IST2022-07-13T16:37:55+5:302022-07-13T16:38:41+5:30
Suniel shetty: गेल्या तीन वर्षांपासून राहुल आणि अथिया एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळे या दोघांच्या लग्नाच्या चर्चा वरचेवर रंगत असतात. यामध्येच गेल्या काही दिवसांपासून या चर्चांनी कमालीचा जोर धरला.

'आमच्याकडे लग्नाच्या तयारीला सुरुवात..'; अथियाच्या लग्नावर सुनील शेट्टीची पहिली प्रतिक्रिया
Athiya shetty KL Rahul Wedding: सध्या सोशल मीडियावर सुनील शेट्टीची (suniel Shetty) लेक अथिया शेट्टी (Athiya Shetty) हिच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. अथिया लवकरच क्रिकेटपटू के.एल. राहुलसोबत (KL Rahul) लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही तर हे दोघं कुठे लग्न करणार याचीही चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, या चर्चांवर आता सुनील शेट्टीने त्याचं मौन सोडलं आहे.
गेल्या तीन वर्षांपासून राहुल आणि अथिया एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळे या दोघांच्या लग्नाच्या चर्चा वरचेवर रंगत असतात. यामध्येच गेल्या काही दिवसांपासून या चर्चांनी कमालीचा जोर धरला. येत्या काही दिवसांमध्ये ही जोडी लग्न करणार असल्याचं म्हटलं जात होतं.मात्र, या चर्चा म्हणजे केवळ अफवा असल्याचं सुनील शेट्टीने स्पष्ट केलं आहे.
काय म्हणाला सुनील शेट्टी?
सध्या तरी अथियाच्या लग्नाचा कोणताही विचार नाही. त्यामुळे आमच्याकडे लग्नाच्या तयारीला सुरुवात वगैरे काहीही झालेलं नाही. त्यामुळे या सगळ्या अफवा आहेत.
दरम्यान, सुनील शेट्टीने या चर्चांना अफवा म्हटल्यानंतर अथियानेही एक पोस्ट शेअर करत या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे अद्यापतरी के.एल. राहुल आणि अथिया यांचं लग्न होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.