Athiya-Rahul Wedding: अथिया-केएल राहुलच्या लग्नाचा शाही थाट; ३ दिवस पाहुण्यांची रेलचेल, पाहा गेस्ट लिस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 18:16 IST2023-01-12T18:15:40+5:302023-01-12T18:16:07+5:30
Athiya-Rahul Wedding : केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी त्यांच्या चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Athiya-Rahul Wedding: अथिया-केएल राहुलच्या लग्नाचा शाही थाट; ३ दिवस पाहुण्यांची रेलचेल, पाहा गेस्ट लिस्ट
सुनील शेट्टी(Suniel Shetty)ची मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल(K L Rahul)च्या लग्नाला बॉलिवूडपासून क्रिकेटर्सपर्यंत अनेक बड्या व्यक्ती हजेरी लावणार आहेत. गेल्या वर्षभरापासून केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या दोघांचे लग्न २३ जानेवारीला होणार असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र लग्नाचे विधी तीन दिवस चालणार आहेत. अद्याप कुटुंबीयांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. रिपोर्ट्सनुसार, केएल राहुल-अथिया शेट्टीचे लग्न खंडाळ्यात होणार आहे.
बॉलिवूडमधील सलमान खान, जॅकी श्रॉफ, अक्षय कुमार, तर महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली यांसारख्या दिग्गज व्यक्ती या सोहळ्याला हजेरी लावणार आहे. लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. सध्या पाहुण्यांच्या यादीतून हीच नावे पुढे आली आहेत. केएल राहुलला वराच्या भूमिकेत आणि अथिया शेट्टीला वधूच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
अथिया शेट्टी आणि केएल राहुल अनेकदा एकत्र दिसले. या दोघांची जोडी अनेकांना खूप आवडते. या जोडप्याचा डेटिंग ते लग्नापर्यंतचा प्रवास खरोखरच रंजक आहे. २३ जानेवारीला अथिया शेट्टी आणि केएल राहुल अखेरलग्नबंधनात अडकणार आहेत.