'या' व्यक्तीच्या सांंगण्यावरून अमिताभ बच्चन 'झुंड'मध्ये काम करण्यास झाले तयार, त्यांनीच केला खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 17:45 IST2022-03-04T17:45:30+5:302022-03-04T17:45:59+5:30
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा 'झुंड' (Jhund Movie) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.

'या' व्यक्तीच्या सांंगण्यावरून अमिताभ बच्चन 'झुंड'मध्ये काम करण्यास झाले तयार, त्यांनीच केला खुलासा!
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट,आमिर खान (Aamir Khan) त्याच्या विशिष्ट निवडींसाठी आणि उत्तम कंटेंट साठी ओळखला जातो, जर आमिर एखाद्या गोष्टीची शिफारस करत असेल तर आपण ते नक्कीच गांभीर्याने घेतले जाते. काही काळापूर्वी त्याचे आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यात असेच काहीसे घडले होते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘झुंड’ (Jhund Movie) या चित्रपटाची शिफारस आमिरनेच बिग बींकडे केली होती आणि त्यांना त्यासाठी तयार देखील केले होते .
हो खरंय, तुम्ही योग्य तेच वाचले आहे! ‘झुंड’ चित्रपट फ्लोअरवर जाण्यापूर्वी, आमिरने चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकली आणि त्याने तो इतका प्रभावित झाला की त्याने मिस्टर बच्चन यांना चित्रपट करण्याची शिफारस केली आणि ते त्यासाठी कसे योग्य आहेत हे पटवूनही दिले. अमिताभ हे झुंडसाठी एक परिपूर्ण निवड आहेत, याची आमिरला खात्री होती.
याबद्दल पुष्टी देताना अमिताभ बच्चन म्हणाले की, “मला आठवते जेव्हा मी आमिरशी याविषयी चर्चा केली होती; त्याने मला मी हा चित्रपट करायलाच हवा असे सांगितले आणि जेव्हा आमिर एखाद्या गोष्टीची शिफारस करतो तेव्हा काय होते हे तुम्हाला माहिती आहे.”
नुकतेच, आमिरने एका स्पेशल स्क्रिनिंगमध्ये हा काळजाला हात घालणारा चित्रपट पाहिला ज्यामुळे तो भावनिक झाला आणि त्याला अश्रू अनावर झाले. एका आघाडीच्या पोर्टलवर चित्रपटाचे कौतुक करताना त्याने नमूद केले होते, “हा एक उत्कृष्ट चित्रपट आहे. हे अविश्वसनीय आणि खूप अनोखे आहे. ते कसे घडले ते मला कळत नाही. मी भारावून गेलो आहे आणि हा चित्रपट मला बाहेर पडू देत नाही. माझ्याकडे शब्द नाहीत कारण हा एक अप्रतिम चित्रपट आहे. २०-३० वर्षात या चित्रपट उद्योगात मी जे काही शिकलो आहे ते सर्व हा चित्रपट तोडून टाकतो.”
आमिर पुढे म्हणाला की, “अमिताभ बच्चन यांनी जबरदस्त काम केले आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपट केले आहेत पण हा त्यांच्या सर्वोत्कृष्ट कलाकृतींपैकी एक आहे; त्यांच्या महान चित्रपटांपैकी एक आहे.”