​आसाम सरकार प्रियांकाला देणार दिवसाला दीड कोटी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2016 17:43 IST2016-08-27T12:04:58+5:302016-08-27T17:43:56+5:30

 बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी विविध राज्यांतील पर्यटनाला प्रोत्साहन देताना दिसत आहेत. मेगास्टार अमिताभ बच्चन गुजरातमधील पर्यटनास चालना देताना दिसत आहे. ...

Assam government to give 1.5 crores to the state? | ​आसाम सरकार प्रियांकाला देणार दिवसाला दीड कोटी?

​आसाम सरकार प्रियांकाला देणार दिवसाला दीड कोटी?

 
ॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी विविध राज्यांतील पर्यटनाला प्रोत्साहन देताना दिसत आहेत. मेगास्टार अमिताभ बच्चन गुजरातमधील पर्यटनास चालना देताना दिसत आहे. तत्पूर्र्वी आमीर खान हाही ‘अतिथी देवो भव:’अभियानाद्वारे देशातील पर्यटनास चालना देताना दिसला. आता प्रियांका चोप्रा ही सुद्धा आसामच्या ‘ओसम आसाम’ या अभियानात सहभाग नोंदवणार असल्याची खबर आहे. अर्थात मोफत नाही तर आसाम सरकार यासाठी प्रियांकाला प्रतिदिन दिड कोटी  मोजणार आहे. होय, या  दहा दिवसांच्या अभियानासाठी प्रियांकाने १५ कोटी मानधन आकारले असल्याची बातमी आहे. म्हणजेच या अभियानाअंतर्गत एका दिवसाच्या प्रमोशनसाठी आसाम सरकार प्रियांकाला दीड कोटी  मोजणार आहे. या अभियानासाठी सर्वप्रथम सचिन तेंडुलकरचे नाव समोर आले होते. मात्र ‘मेरी कोम’या चित्रपटानंतर ईशान्येकडील राज्यांत प्रियांकाची वाढलेली लोकप्रीयता बघता सचिनऐवजी प्रियांकाचे नाव फायनल झाले. एवढेच नाही तर यासाठी तिला १५ कोटी मोजण्यासही आसाम सरकार तयार झाले. अन्य स्टार्स अशा अभियानासाठी कुठलेही मानधन आकारत नाहीत. त्यामुळे प्रियांकाच्या या अभियानासाठी १५ कोटी घ्यावेत, यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. पूराच्या तडाख्यात सापडलेले आसाम सध्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. अशास्थितीत राज्य सरकारने पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी कोट्यवधी रुपये मोजून ब्रँण्ड अ‍ॅम्बिसीडर निवडावा, याचेही अनेकांना आश्चर्य वाटत आहे.
 

Web Title: Assam government to give 1.5 crores to the state?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.