पन्नाशी पार केलेला शाहरुख करतो हेअर कलर?; चाहत्याच्या प्रश्नावर अभिनेत्याने दिलं खरं उत्तर, म्हणाला..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 18:50 IST2023-09-27T18:49:52+5:302023-09-27T18:50:29+5:30

Shahrukh khan: #asksrk या सेशनमध्ये शाहरुखने चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं

asksrk-jawan fame actor-shahrukh khan-replied-fans-who-ask question about hair colour | पन्नाशी पार केलेला शाहरुख करतो हेअर कलर?; चाहत्याच्या प्रश्नावर अभिनेत्याने दिलं खरं उत्तर, म्हणाला..

पन्नाशी पार केलेला शाहरुख करतो हेअर कलर?; चाहत्याच्या प्रश्नावर अभिनेत्याने दिलं खरं उत्तर, म्हणाला..

बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान याचा जवान हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर राज्य गाजवत आहे. हा सिनेमा रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. विशेष म्हणजे देशासह विदेशातही हा सिनेमा सुपरहिट ठरत आहे. इतकंच नाही तर शाहरुखचे चाहते त्याच्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. यात काही चाहत्यांनी तर त्याला कमालीचे सरप्राइजही दिले आहेत. त्यामुळे शक्य होईल त्याप्रमाणे शाहरुख त्यांचे आभार मानत आहे. यात नुकतंच त्याने #asksrk हे सेशन घेतलं. यावेळी त्याने चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची खरी उत्तरं दिली. या सेशनमध्ये त्याला एका चाहत्याने केसांना कलर करतोस का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं किंग खानने उत्तर दिलं आहे.

शाहरुख वरचेवर ट्विटरवर #asksrk हे सेशन घेत असतो. या सेशनमध्ये चाहते त्याला काही प्रोफेशनल तर काही पर्सनल प्रश्न विचारतात. विशेष म्हणजे शाहरुख सुद्धा या प्रश्नांची खरी उत्तरं देतो. अलिकडेच शाहरुखने घेतलेल्या या सेशनमध्ये एका चाहत्याने शाहरुखला केसांना हेअर डाय करतोस का?  असा प्रश्न विचारला. 

शाहरुख सिनेमांसह काही कमर्शिअल जाहिरातीदेखील करतो. यात बऱ्याचदा तो हेअर कलरच्या जाहिराती करतांना दिसतो. त्यामुळेच इतरांना हेअर कलर करायला सांगणारा शाहरुख खरंच स्वत: पण केस रंगवतो का? असा प्रश्न या चाहत्याला पडला होता. अखेर त्याने हा प्रश्न शाहरुखला विचारला आणि अभिनेत्यानेही त्याचं खरं उत्तरं दिलं.

'तुम्ही खरंच हेअर डायचा वापर करता का?' असा प्रश्न एका चाहत्याने शाहरुखला विचारला. त्यावर, "हाहा..थोडा थोडा..नाही खरं तर खूप जास्त", असं उत्तर शाहरुखने दिलं. त्याच्या या उत्तरावरुन तो खरोखर केस काळे दिसावेत यासाठी हेअर डायचा वापर करतो हे त्याने कबूल केलं. त्याचं हे उत्तर ऐकल्यावर अनेकांनी त्याच्यावर कमेंटचा पाऊस पाडला आहे. तर, तो खरं बोलला यामुळे काहींनी त्याचं कौतुकही केलं आहे.
 

Web Title: asksrk-jawan fame actor-shahrukh khan-replied-fans-who-ask question about hair colour