"गालावर हळद, कपाळावर कुंकू..."; अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 14:15 IST2025-05-31T14:11:20+5:302025-05-31T14:15:18+5:30
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या हळदीचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा आहे. काय आहे या फोटोमागील सत्य?

"गालावर हळद, कपाळावर कुंकू..."; अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण
बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री थाटामाटात लग्न करुन चाहत्यांचं लक्ष वेधतात. होणाऱ्या पतीसोबत सप्तपदी करताना बॉलिवूड कलाकार चर्चेत असतात. अशातच बॉलिवूडमध्ये लवकरच पदार्पण करणाऱ्या एका अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ही अभिनेत्री म्हणजे श्रीलीला. गालावर हळद, कपाळावर कुंकू असलेल्या श्रीलीलाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे श्रीलीला (srileela) लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा आहे.
श्रीलीलाचे व्हायरल फोटो आणि चर्चांना उधाण
साउथ अभिनेत्री श्रीलीलाचे नुकतेच सोशल मीडियावर पारंपरिक पोशाखातील फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोत तिच्या कपाळावर कुंकू आणि गालावर हळद लावलेली दिसते. या फोटोंमुळे श्रीलीला लवकरच लग्न करणार अशी चर्चा सुरु झाली आहे. पण श्रीलीला खरंच लग्न करणार का? तर याचं उत्तर आहे नाही. श्रीलीला जरी फोटोंमध्ये पारंपरिक अंदाजात दिसत असली तरीही तिच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगचा हा सीन असल्याचं बोललं जात आहे. याशिवाय श्रीलीला एका कौटुंबीक कार्यक्रमात सहभागी झाली असून तिथे असलेल्या विधींप्रमाणे तिच्या गालावर हळद लागली आहे, अशीही चर्चा आहे.
गेल्या काही दिवसांपासून श्रीलीला आणि कार्तिक आर्यन एकमेकांना डेट करत आहेत, असंही बोललं जात आहे. 'आशिकी ३'मध्ये दोघेही एकमेकांसोबत स्क्रीन शेअर करत असून श्रीलीला आणि कार्तिक यांच्यात या सिनेमाच्या जवळीक वाढली असून दोघेही रिलेशनशीपमध्ये आहेत, अशी चर्चा आहे. याविषयी दोघांनी मात्र जाहीर खुलासा केला नाही. २०२४ च्या अखेरीस रिलीज झालेल्या 'पुष्पा २'मध्ये आयटम साँग करुन श्रीलीला चांगलीच प्रकाशझोतात आली. आता कार्तिकसोबत 'आशिकी ३'मध्ये काम करुन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. श्रीलीलाच्या व्हायरल फोटोंमागचं सत्य नेमकं काय, हे लवकरच स्पष्ट होईल.