आशा भोसलेंची नात पाहिलीत का? बॉलिवूड अभिनेत्रींना देतीये टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 18:24 IST2024-01-04T18:21:20+5:302024-01-04T18:24:34+5:30

नुकतेच एका कार्यक्रमात आशा भोसले यांनी नातीसोबत हजेरी लावली.

Asha Bhosle's Granddaughter Zanai Bhosle is incredibly beautiful | आशा भोसलेंची नात पाहिलीत का? बॉलिवूड अभिनेत्रींना देतीये टक्कर

आशा भोसलेंची नात पाहिलीत का? बॉलिवूड अभिनेत्रींना देतीये टक्कर

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे नाव संगीतविश्वात मोठ्या आदराने घेतले जाते. या झगमगत्या जगात त्यांनी सात दशकांहून अधिक काळ उत्कृष्ट आणि अगणित काम करून लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. नुकतेच एका कार्यक्रमात आशा भोसले यांनी नातीसोबत हजेरी लावली. यावेळी तिच्या सौंदर्याने सर्वांचं लक्ष वेधलं. काहींनी तर तिची तुलना बॉलीवूड अभिनेत्रींशी केली आहे.

आशा भोसले यांच्या नातीचे नाव जनाई भोसले आहे. एका मराठी चित्रपटाच्या प्रिमिअरला जनाईने आजी आशा भोसले यांच्याबरोबर हजेरी लावली होती. साडीत ती अगदी सुंदर दिसत होती. जनाईने सोशल मीडियावर आशा भोसले यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. तिने कॅप्शनमध्ये लिहलं, 'तेरा मुझे है पहले…'. तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी तिचं खूप कौतुक केलं आहे.

साडीवरील तिचा सुंदर लूक पाहून नेटकरी अक्षरश: घायाळ झाले आहेत. जनाईचे डोळे ऐश्वर्यासारखे, नाक आणि आयब्रोज काजोलसारखे आहेत, असं निरीक्षणही चाहत्यांनी नोंदवलं आहे. जनाई ही आशा भोसले यांचे पूत्र आनंद भोसले यांची मुलगी आहे. जनाईही सुद्धा गायिका आहे. जनाईचं आजी लता मंगेशकर यांच्याशी देखील खास ट्युनिंग होतं.जनाई बॉलिवूडमध्ये पदार्पण करु शकते असं म्हटलं जात आहे. जनाईला फिरण्याची प्रचंड आवड असून कोणत्याही नव्या ठिकाणाला भेट दिल्यावर ती तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.
 

Web Title: Asha Bhosle's Granddaughter Zanai Bhosle is incredibly beautiful