९० व्या वर्षी आशा भोसलेंची भव्यदिव्य म्यूझिक कॉन्सर्ट! कधी? कुठे? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 15:36 IST2024-02-29T15:35:12+5:302024-02-29T15:36:25+5:30

वयाच्या ९० व्या वर्षी सदाबहार गायिका आशा भोसले यांची गाणी LIVE ऐकण्याची संधी मिळणार आहे

Asha Bhosle's grand musical live concert at the age of 90 mumbai jio garden | ९० व्या वर्षी आशा भोसलेंची भव्यदिव्य म्यूझिक कॉन्सर्ट! कधी? कुठे? वाचा सविस्तर

९० व्या वर्षी आशा भोसलेंची भव्यदिव्य म्यूझिक कॉन्सर्ट! कधी? कुठे? वाचा सविस्तर

आशा भोसले म्हणजे भारतीय मनोरंजन विश्वातील सदाबहार गायिका. आशा भोसलेंची गाणी गेली अनेक वर्ष रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. आशाताई आता नव्वदीच्या घरात असल्या तरीही त्यांच्या सुरांची जादू अजुनही कायम आहे. संगीतप्रेमींना आशा भोसलेंची गाणी लाईव्ह ऐकण्याची पर्वणी मिळणार आहे. मुंबईत आशाताईंच्या भव्यदिव्य म्युझिकल कॉन्सर्टचं आयोजन केलं जात आहे.

 आशा भोसले यांची 'आशा @ 90: वो फिर नहीं आते' ही सर्वात मोठी संगीत मैफल मुंबईतील जिओ गार्डनमध्ये होणार आहे. या कॉन्सर्टची जय्यत तयारी सुरू झाली आहे.  सदाबहार गायिका आशा भोसलेंच्या चाहत्यांसाठी सुमधुर संगीताची मेजवानीच असणार आहे. आशाताई त्यांची नात जानाई भोसले आणि गायक सुदेश भोसले यांच्यासोबत या मैफिलीची तयारी करताना दिसल्याा.

9 मार्च 2024 रोजी जिओ गार्डन, मुंबई येथे संध्याकाळी 7 वाजल्यापासून आशा ताईंची ही मैफिल रंगणार आहे. क्लासिकल  बॉलीवुड हिट, गझल आणि सदाबहार गाणी अशा विविध प्रकारांत आशा ताईंचे सादरीकरण होणार आहे. या मैफिलीत आशा भोसले यांच्यासोबत गायक सुदेश भोसलेही त्यांना साथ देणार आहेत. याशिवाय त्यांची नात जानाई शास्त्रीय नृत्य सादर करणार आहे.

Web Title: Asha Bhosle's grand musical live concert at the age of 90 mumbai jio garden