Video : हृतिकच्या गाण्यावर आशा भोसले यांनी धरला ठेका, पाहून तुम्हीही व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 13:11 IST2021-04-22T13:08:37+5:302021-04-22T13:11:25+5:30
Watch Video : रॉकस्टार!! कमरेत साडी खोचून आशा भोसले ‘एक पल का जीना’ या गाण्यावर ठेका धरताना दिसतात.

Video : हृतिकच्या गाण्यावर आशा भोसले यांनी धरला ठेका, पाहून तुम्हीही व्हाल हैराण
आशा भोसले (Asha Bhosale) एक सदाबहार गायिका. त्यांच्या आवाजावर अख्खे जग फिदा आहे. भक्तीगीत, भावगीत, गझल, शास्त्रीय संगीत आणि लोकगीतांपासून तर पॉप गाण्यांपर्यंत सगळे काही गाणा-या आशा दीदींची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. पण त्यांची एक ओळख मात्र करून द्यावीच लागेल. होय, आशा दीदी उत्तम डान्सरही आहेत. आशा दीदींचे वय किती तर 88 वर्षे. पण या वयातही त्यांनी केलेला डान्स पाहाल तर फिदा व्हाल. (Asha Bhosale dance video)
सध्या आशा भोसले यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यात आशा दीदी हृतिक रोशनच्या ‘एक पल का जीना’ या गाण्यावर धम्माल डान्स करताना दिसत आहेत. खास बात म्हणजे, यात हृतिक रोशनच्या अनेक सिग्नेचर स्टेप्सही त्यांनी केल्या आहेत.
हा व्हिडीओ तसा जुना़ एका कॉन्सर्टमधला. पण यातील आशा दीदींचा जिंदादिल डान्स सर्वांना हैराण करतोय.
या व्हिडीओवरच्या प्रतिक्रिया पाहाल तर तुम्हालाही याचा अंदाज येईल. आशा दीदींना असा डान्स करताना पाहून लोकांचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. अनेकांनी तर त्यांना रॉकस्टार संबोधले आहे. या वयातही आशा दीदींचा हा सळसळता उत्साह आणि ऊर्जा तरूणांनाही लाजवणारा आहे.
सहा दशकांहून अधिक काळ खणखणीत आणि दमदार आवाजाचा रसिकमनावर ठसा उमटवणा-या आशा भोसले यांचे संगीतक्षेत्रात मोठे योगदान आहे. कला क्षेत्रातील आपल्या प्रदीर्घ प्रवासात हजारो मराठी, हिंदी आणि विविध भाषांमधील गाणी गायली आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या ज्येष्ठ भगिनी आणि जगविख्यात गायिका लता मंगेशकर यांच्या सावलीखाली न वाढता आपले स्वत:चे अस्तित्व तयार करत त्या वटवृक्ष झाल्या. लता हिंदी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवत असताना आशा भोसलेंनी मराठीत आणि हिंदीतही अविस्मरणीय गायन करत आपली वेगळी चमक दाखवली.