ऐश एक उत्तम अभिनेत्री - ओमंग कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2016 14:47 IST2016-11-02T14:47:55+5:302016-11-02T14:47:55+5:30

ओमंग कुमार दिग्दर्शित ‘सरबजीत’ चित्रपटाचे कथानक, ऐश्वर्या रॉय बच्चनचा अभिनय यामुळे चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट झाला. ऐशच्या अभिनयाने ओमंग ...

Ash is a great actress - Omang Kumar | ऐश एक उत्तम अभिनेत्री - ओमंग कुमार

ऐश एक उत्तम अभिनेत्री - ओमंग कुमार

ंग कुमार दिग्दर्शित ‘सरबजीत’ चित्रपटाचे कथानक, ऐश्वर्या रॉय बच्चनचा अभिनय यामुळे चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट झाला. ऐशच्या अभिनयाने ओमंग कुमार प्रचंड प्रभावित झाले होते. त्यामुळे ते असे मानतात की, ऐश्वर्या ही दिग्दर्शकाची आवडीची कलाकार आहे.

ते म्हणतात,‘ती एक खुप चांगली कलाकार आहे. पण ती दिग्दर्शकांची कलाकार आहे. त्यामुळे ती दिग्दर्शक जसे सांगतील त्याप्रमाणे स्वत:ला भूमिकेत उतरवते. आम्ही जेव्हा तिला ‘दलबीर कौर’ हिच्या भूमिकेसाठी निवडले तेव्हा तिने ते आॅनस्क्रीन स्वत:ला सिद्ध केले. तिथे आपण तिला ‘ग्लॅमरस दिवा’ म्हणून पाहिले नाही. तर भावासाठी लढणारी एक बहीण म्हणून तिने भूमिका साकारली आहे.’ 

१९९४ मध्ये ‘मिस वर्ल्ड’चा किताब मिळवल्यानंतर ऐश्वर्याने ‘हम दिल दे चुके सनम’,‘ताल’, ‘धूम २’ या चित्रपटात वेगळा ठसा उमटविला. सरबजीतनंतर तिची अभिनेत्री म्हणून जी ख्याती होती ती बदलली गेली. ती केवळ चित्रपटात भूमिका साकारते एवढेच नव्हे तर ती दिग्दर्शकाच्या मनातील तिची भूमिका आॅनस्क्रीन बजावते. ओमंग कु मारसोबत तिचा एक खुप चांगला बाऊं ड तयार झाला आहे.

Web Title: Ash is a great actress - Omang Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.