‘जलसा’ सोडून नव्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होऊ शकतात ऐश-अभिषेक बच्चन; पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 16:26 IST2018-01-06T10:56:03+5:302018-01-06T16:26:03+5:30

अभिनेता अभिषेक बच्चन याला इंडस्ट्रीत ज्युनियर बच्चन या नावाने ओळखले जाते. कारण तो महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा असून, ...

Ash-Abhishek Bachchan may shift from 'Jalsa' to new flat; See photo! | ‘जलसा’ सोडून नव्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होऊ शकतात ऐश-अभिषेक बच्चन; पाहा फोटो!

‘जलसा’ सोडून नव्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होऊ शकतात ऐश-अभिषेक बच्चन; पाहा फोटो!

िनेता अभिषेक बच्चन याला इंडस्ट्रीत ज्युनियर बच्चन या नावाने ओळखले जाते. कारण तो महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा असून, इंडस्ट्रीत सुपरस्टार आहे. अभिषेकचे लग्न माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय हिच्याशी झाले असून, या दाम्पत्याला आराध्या नावाची एक क्यूट मुलगी आहे. या दाम्पत्याच्या प्रॉपर्टीविषयी सांगायचे झाल्यास, देशातील विविध भागांमध्ये त्यांचे बंगले आहेत. मात्र सध्या त्यांच्या मुंबईतील एका नव्या घराची चांगलीच चर्चा आहे. होय, कदाचित ही बाब तुम्हाला माहिती नसेल परंतु मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी एक शानदार फ्लॅट खरेदी केला आहे. या फ्लॅटचा एरिया ५,५०० स्क्वेअर फूट इतका आहे. हा फ्लॅट २०१५ मध्ये २१ कोटी रुपयांमध्ये खरेदी केला होता. मात्र सध्या या फ्लॅटची डिमांड एवढी वाढली की, त्याची किंमत दुपटीने झाली आहे.





वास्तविक असे कितीतरी फ्लॅट ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नावे आहेत. मात्र अद्यापपर्यंत हे निश्चित झाले नाही की, जुहू परिसरातील ‘जलसा’ बंगला सोडून हे दाम्पत्य या फ्लॅटमध्ये केव्हा शिफ्ट होतील? सूत्रानुसार, या बिल्डिंगमध्ये अभिनेत्री सोनम कपूरने एक फ्लॅट खरेदी केला आहे. त्याचा एरिया ७ हजार स्क्वेअर फूट आहे. सोनमने हा फ्लॅट ३५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केला आहे. त्याचबरोबर याच बिल्डरकडून कंगणा राणौत, प्रियंका चोपडा आणि विरुष्कानेही फ्लॅट खरेदी केला आहे. 







दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शाहरूख खानची पत्नी गौरी खान, अभिषेक आणि ऐश्वर्या दिसत असलेला एक फोटो व्हायरल झाला होता. गौरी सध्या तिच्या जुहू येथील ‘गौरी खान डिझाइन्स’ या स्टोरमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. या स्टोरमध्ये बॉलिवूड कलाकारांचे नेहमीच येणे-जाणे असते. असे म्हटले जात आहे की, ऐश-अभिषेक गौरीकडूनच त्यांच्या या फ्लॅटचे काम करू इच्छितात. 

Web Title: Ash-Abhishek Bachchan may shift from 'Jalsa' to new flat; See photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.