/>काही दिवसांपूर्वी शाहरुख खानने सांगितले होते की, त्याचा मुलगा आर्यन खान लवकरच फिल्म स्कूल जॉईन करेल. मात्र शाहरुखने आर्यनच्या एक्टिंग करिअरचा अजून काही उल्लेख केला नसला तरी अशी चर्चा सुरु आहे की, फिल्म स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर आर्यन चित्रपटसृष्टीत पदार्पण करेल. सुत्रानूसार समजले आहे की, बॉलिवूडचे दोन नावे आर्यनला ‘धूम ५’मध्ये लॉन्च करण्याची चर्चा करीत आहेत. जर ‘धूम ५’च्या बाबतीत म्हटले तर आर्यन खान स्पोर्ट्स आणि मार्शल आर्टस् मध्ये एक्टीव्ह आहे. तर आर्यन या चित्रपटासाठी परफेक्ट आहे, असे म्हणायला काही हरकत नाही.