आर्यनला उद्ध्वस्त करू नका...., हा फक्त तमाशा...! बॉलिवूडकर शाहरूख-आर्यनच्या पाठीशी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 04:12 PM2021-10-04T16:12:40+5:302021-10-04T16:13:20+5:30

Aryan Khan Arrest updates : बॉलिवूड सेलिब्रिटींचा शाहरूख-आर्यनला फुल्ल सपोर्ट, वाचा पोस्ट

Aryan Khan Arrest updates Pooja Bhatt Suchitra Krishnamurthy Hansal Mehta supports shahrukh khan and aryan khan | आर्यनला उद्ध्वस्त करू नका...., हा फक्त तमाशा...! बॉलिवूडकर शाहरूख-आर्यनच्या पाठीशी

आर्यनला उद्ध्वस्त करू नका...., हा फक्त तमाशा...! बॉलिवूडकर शाहरूख-आर्यनच्या पाठीशी

googlenewsNext
ठळक मुद्देअभिनेत्री नफीसा अली सोढी यांनीही आर्यनसाठी ट्विट केलं आहे.

शाहरूख खान (Shahrukh Khan ) व गौरी खानचा लाडका लेक आर्यन खानची  (Aryan Khan Arrest updates) कालची रात्र एनसीबीच्या कोठडीत गेली. एनसीबीच्या कोठडीत रात्रभर आर्यनची चौकशी झाली.  यादरम्यान आर्यन खान अक्षरश: ढसाढसा रडत होता. त्याला एनसीबीच्या कार्यालयातील लँडलाईनवरून अगदी दोन मिनिटं वडिलांशी म्हणजेच शाहरूखची बोलायची संधी दिली गेली. अद्याप शाहरूख खान लेकाच्या अटकेवर काहीही बोललेला नाही. पण बॉलिवूडमधून मात्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काल सुनील शेट्टीने  त्या पोराला श्वास तरी घेऊ द्या, असं म्हणत आर्यनची बाजू घेतली होती. रात्री उशीरा सलमान खानने ‘मन्नत’वर पोहोचत शाहरूख व गौरीला धीर दिला होता. आता बॉलिवूड दिग्दर्शक हंसल मेहता यांनी शाहरूखला फुल्ल सपोर्ट दिला आहे. शाहरूख मी तुझ्यासोबत आहे,  असं त्यांनी म्हटलं आहे. बॉलिवूडच्या अन्य काही सेलिब्रिटींनीही शाहरूखला पाठींबा दिला आहे.

शाहरूख, मी तुझ्यासोबत...

हंसल मेहता (Hansal Mehta) यांनी सोशल मीडियावर एक  ट्विट केलं. ‘आपलं मुल अडचणीतआहे, हे पाहणं कोणत्याही पालकांसाठी वेदनादायी असतं. कायदा काही ठरवेल, त्याआधीच लोक निकाल देऊन मोकळे होतात, तेव्हा तर ते अधिक वेदनादायी ठरतं. हा पालक शिवाय पालक व मुलांच्या नात्याचा अपमान आहे. हे गैर आहे. शाहरूख, मी तुझ्यासोबत आहे,’असं  ट्विट हंसल मेहता यांनी केलं आहे.

ही वेळ सुद्धा निघून जाईल...

पूजा भट (Pooja Bhatt ) हिनेही शाहरूखला पाठींबा दिला आहे. ‘मी तुझ्यासोबत आहे. तुला आमची गरज आहे, असं नाही. पण तरी मी सोबत आहे. ही वेळसुद्धा निघून जाईल,’असं पूजा भटने म्हटले आहे.

हा फक्त तमाशा...

कभी हा कभी ना या चित्रपटात शाहरूखसोबत काम करणारी अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती (Suchitra Krishnamurthy ) हिनेही  ट्विट केले आहे. ‘मुलांना संकटात पाहण्यापेक्षा त्रासदायक पालकांसाठी काहीही नसतं. बॉलिवूडला लक्ष्य करणा-या एनसीबीने आत्तापर्यंत फिल्म स्टार्सवर टाकलेले छापे लक्षात आहेत ना? त्यांना काहीही सापडलं नाही आणि काहीच सिद्ध झालं नाही. हा फक्त तमाश आहे. ही प्रसिद्धीची किंमत आहे,’असं ती म्हणाली.

आर्यनला उद्धवस्त करू नका...

अभिनेत्री नफीसा अली सोढी यांनीही आर्यनसाठी ट्विट केलं आहे. ‘आर्यनसाठी मी प्रार्थना करते. त्याला मदतीची गरज आहे. त्याला उद्धवस्त करू नका,’अशी पोस्ट नफीसा यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टवरून अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे.

Web Title: Aryan Khan Arrest updates Pooja Bhatt Suchitra Krishnamurthy Hansal Mehta supports shahrukh khan and aryan khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.