आर्यन खान अन् 'या' मॉडेलच्या डेटिंगच्या चर्चा; शाहरुखची सून होणार ही परदेशी अभिनेत्री?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 13:00 IST2024-04-02T12:58:52+5:302024-04-02T13:00:23+5:30
आर्यन खानला प्रेमात पाडणारी कोण आहे ही परदेशी अभिनेत्री?

आर्यन खान अन् 'या' मॉडेलच्या डेटिंगच्या चर्चा; शाहरुखची सून होणार ही परदेशी अभिनेत्री?
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा लाडका मुलगा आर्यन खान (Aryan Khan) काही वर्षांपासून प्रसिद्धीझोतात आहे. 2020 साली ड्र्ग्स केसमध्ये अडकल्याने त्याला तुरुंगात जावं लागलं. काही महिन्यांनी तो बाहेर आला. आता आर्यन सिनेसृष्टीतही पदार्पण करत आहे. पण अभिनेता नाही तर त्याला दिग्दर्शनात रस आहे. याशिवाय आर्यन एका परदेशी मॉडेलला डेट करत असल्याच्याही चर्चा आहेत. कोण आहे ती मुलगी?
रेडिटवर एका युझरने जुन्या म्युझिक प्रोग्रॅमची क्लिप शेअर केली. यामध्ये आर्यन खान परदेशी मॉडेल लारिसा बोन्सी(Larissa Bonesi) सहभागी झालेले दिसत आहेत. युझरने क्लिप शेअर करत आर्यन आणि लारिसा डेट करत असल्याचा अंदाज लावला. या पोस्टनंतर सोशल मीडियावर आर्यनच्याच अफेअरची चर्चा रंगली. इतकंच नाही तर दोघांनी एकमेकांच्या कुटुंबातील सदस्यांनाही इन्स्टाग्रामवर फॉलो केलं आहे.
सध्या आर्यन आणि लारिसा दोघांनाही डेटिंगच्या चर्चांवर भाष्य केलेलं नाही. आर्यन स्वत: खूप प्रायव्हेट व्यक्ती आहे. तो फारसा माध्यमांसमोर येत नाही. त्यामुळे आर्यन आणि लारिसा यांच्यात केवळ मैत्री आहे की खरंच दोघं एकमेकांना डेट करत आहेत याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तरी सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. एका सोशल मीडिया युझरने लिहिले की नुकत्याच लारिसाच्या बर्थडे पार्टीला आर्यन खाननेही हजेरी लावली होती. त्यामुळे एक परदेशी मुलगी शाहरुख खानची सून होणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.